लोकसभेच्या निकालाने सर्वांना जमिनीवर आणलं, राज ठाकरेंच्या वक्तव्यावर पवार म्हणाले, ‘आमचे पाय…’

लोकसभेच्या निकालाने सर्वांना जमिनीवर आणलं, राज ठाकरेंच्या वक्तव्यावर पवार म्हणाले, ‘आमचे पाय…’

Sharad Pawar On Raj Thackeray  : लोकसभा निवडणुकी 400 पारचा नारा देणाऱ्या भाजपने (BJP) 240 जागा जिंकल्या. एनडीएला 300 चा आकडा पार करता आला नाही. भाजपसह एनडीएतील मित्रपक्षांना 292 जागांवर समाधान मानावे लागले. तर इंडिया आघाडीने (India Alliance) 237 जागा जिंकल्या. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या निकालावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी बेधडक वक्तव्य केलं. त्या वक्तव्याला शरद पवारांनी (Sharad Pawar) मोजक्यात शब्दात प्रत्युत्तर दिलं.

रोहित-विराट पाठोपाठ रवींद्र जडेजाचाही मोठी घोषणा; T20 International cricketमधून निवृत्ती 

शरद पवारांनी आज पुण्यात माध्यांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्यांना यंदाच्या लोकसभा निकालाने सर्वांनाच जमीनीवर आणलं या राज ठाकरेंच्या वक्तव्याविषयी विचारले असता त्यांनी एकाच वाक्तात राज ठाकरेंचा विषय संपवला. ते काय म्हणाले, मला माहिती नाही. पण, आमचे पाय जमिनीवरच आहेत, असं पवार म्हणाले.

राज ठाकरे काय म्हणाले?
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नुकतीच अमेरिकेमधील बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळाला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलतांना त्यांनी अनेक मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, उद्या कोण या पक्षातून त्या पक्षात जातील, हे माहीत नाही. येत्या काळात कोण कोणत्या पक्षात जातं, हे पाहण्यासाठी वर्षभर कळ सहन करू. पण लोकसभेच्या निकालाने सर्वांनाच जमिनीवर आणून ठेवलं, असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलं होतं.

पैशांशिवाय निबंधाची शिक्षा अशक्य; पुणे अपघात प्रकरणी राज ठाकरेंचे न्यायाधिशांवरही ताशेरे 

यावेळी अर्थसंकल्पावरूनही शरद पवार यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. तुमच्या खिशात काय हे न तपासता तुम्ही बाजारात जाऊन खरेदी करायला गेलात तर काय अवस्था होते, हे मी सांगण्याची गरज नाही. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेनं दिलेल्या निकालाचा धसका सरकारन घेतला आहे. त्यामुळं अशाप्रकारची आखणी केली जात आहे. सरकारनं तातडीनं योजना लागू करणार असल्याचं सांगितलं. पण, आता फार दिवस राहिले नाहीत. थोड्यात दिवसात वस्तुस्थिती समोर येईल,असं शरद पवार म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज