Weather Update : राज्यात थंडीचा कडाका वाढत असतानाच अनेक ठिकाणी पाऊस होत आहे. या अवकाळी पावसाने (Weather Update) रब्बी हंगामातील पिके संकटात सापडली आहेत. आणखी काही दिवस अवकाळीचं सकंट कायम राहण्याची शक्यता व्यक्त होत (Rain Alert) आहे. आज मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि जळगाव जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सोमवारी मुंबईसह नवी मुंबई भागात […]
vidarbh tourism : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (8 जानेवारी) विदर्भात पर्यटन विकासाला अमर्याद संधी आहेत. विदर्भातील पर्यटनाला चालना देण्यासाठी नागपूरसह अमरावती विभागातील महत्वाच्या पर्यटन क्षेत्रांची एकत्रित सांगड घालून टुरिझम सर्किट विकसीत करण्याच्या सूचना दिल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजनेची (सर्वसाधारण) राज्यस्तरीय बैठक मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती सभागृहात आयोजित करण्यात आली होती. […]
OBC Reservation : राज्यात सध्या एकीकडे मराठा आरक्षण तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणाचा (OBC Reservation) मुद्दा ऐरणीवर आला आहे. मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. यातच आता ओबीसी जन मोर्चाचे अध्यक्ष प्रकाश अण्णा शेंडगे यांनी पत्रकार परिषद घेत 20 जानेवारीपासून मराठ्यांप्रमाणेच मुंबईत ओबीसी समाज देखील आंदोलनाला बसणार असल्याचा इशारा दिला आहे. ‘लोकसभेसाठी भाजपची घरोघरी […]
CM Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Shinde) आज (8 जानेवारी) नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी शिंदे यांच्यासमोर गोंधळ घातल्याचे पाहायला मिळालं. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनांमध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी या आंदोलकांनी केली. या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी अगोदरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भेटीची मागणी केली होती. मात्र पोलिसांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शिंदे यांना भेटण्यासाठी मज्जाव केला. […]
कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील (Hatkanangle Lok Sabha) जागेवरून झालेल्या वादातून उद्धव ठाकरे गटाचे कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव (Murlidhar Jadhav) यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली. तब्बल 19 वर्ष जिल्हाप्रमुख राहिलेले मुरलीधर जाधव यांना पदावरून काढल्याने ते ढसाढसा रडले होते. त्यामुळे ते चर्चेत आले आहे. त्यांनी लेट्सअपशी संवाद साधला. त्यात जाधव यांनी शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारेंवर […]
Ahmednagar News : लोकसभा निवडणुकीचे पडघम सुरू झाले असतानाच त्यानंतर राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा विधानसभेसाठी काँग्रेसच्या नागवडे दांपत्याने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष किंवा इतर पर्याय खुले असून निवडणूक लढवणारच, अशी घोषणाच काँग्रेसच्या महिला […]