मविआत ट्विस्ट! माजी आमदाराचा चक्क अपक्षाला पाठिंबा; नेमकं काय घडलं?
Maharashtra Elections : राज्यात विधानसभा निवडणुकीत प्रचाराचा (Pune News) धुराळा उडाला आहे. स्टार प्रचारकांच्या सभांनी राजकारण ढवळून निघालं आहे. आज रविवारी प्रचाराचा धुराळा उडणार आहे. अनेक नेते आणि स्टार प्रचारकांच्या सभा आज होणार आहेत. मात्र त्याआधीच पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील हडपसर मतदारसंघात आघाडीत बिघाडी झाली आहे. शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर यांनी अपक्ष उमेदवार गंगाधर बने यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
मतदान दोन दिवसांनंतर आलेलं असताना ही घडामोड घडल्याने महाविकास आघाडीला (Maharashtra Elections) मोठा ट्विस्ट आल्याचं सांगितलं जात आहे. महादेव बाबर यांनी पत्रकार परिषदेत अपक्ष उमेदवार गंगाधर बधे हेच महादेव बाबर आहेत असे समजून मतदान करा, असे आवाहन केले. त्यांच्या या भूमिकेची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
पुण्याला देशातील पहिले कनेक्टीव्हीटी शहर बनवणार, पुणेकरांना पंतप्रधान मोदींची ग्वाही
हडपसर मतदारसंघात शिवसेनेची मोठी ताकद आहे. उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही गंगाधर बने यांना अपक्ष म्हणून निवडणुकीत उभे केले आहे, असे महादेव बाबर यावेळी म्हणाले. मतदारसंघामध्ये मला मानणारा शिवसैनिक आणि मतदार वर्ग मोठा आहे. मी मतदारसंघात केलेली विकासकामे आणि मतदारांसोबत माझा संपर्क आहे. मी मतदारसंघातील प्रश्न आंदोलनांच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. गंगाधर बधे यांनी सुद्धा शिवसेनेशी एकनिष्ठ राहून नागरिकांची मदत करण्याचे काम केले आहे. आम्ही दोघेही शिवसैनिक आहोत. त्यामुळे गंगाधर बधे हेच महादेव बाबर आहेत असे समजून मतदान करा, असे आवाहन महादेव बाबर यांनी केले.