पुण्याला देशातील पहिले ‘कनेक्टीव्हीटी’ शहर बनवणार, पुणेकरांना पंतप्रधान मोदींची ग्वाही
PM Modi : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यात महायुतीच्या (Mahayuti) प्रचारार्थ स.पा.महाविद्यालयाच्या मैदानावर जाहीर सभा घेतली. या सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी भाजपच्या (BJP) विचारांचा पुण्याने नेहमी समर्थन केला आहे. भाजप आणि पुण्याचं नातं विचार आणि आस्थाचा नातं आहे. असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
या सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आज ज्या कंपन्यांना भारतात गुंतवणूक करण्यास इच्छुक आहे. त्यांच्या आवडत्या ठिकाणात पुणेचा समावेश असतो. महायुती सरकारने पुण्यात मेट्रोचा विस्तार केला आहे. स्वारगेट- कात्रज सेक्शनमध्ये मेट्रोचं काम वेगाने पुढं जात आहे. तसेच आमची सरकार इन्ट्रासिटी आणि इंटरसिटी कनेक्टिविटीसाठी प्रयत्न करत आहे. असं देखील मोदी म्हणाले.
तसेच मिसिंग लिंक एक्सप्रेस वे वरील आणि पुण्याच्या रिंग रोडचे काम सुरु करण्यात आले आहे. याच बरोबर आंबेगाव येथील शिवसृष्टीचे काम वेगात सुरु आहे. असं देखील नरेंद्र मोदी म्हणाले.
पुढे बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, आम्ही आयटी हब पुण्याला देशातील पहिले कनेक्टीव्हीटी शहर बनवणार आहे. आज मी तुम्हाला भरवसा देतो महायुतीचं नवीन सरकार आणखी वेगानं पुण्याच्या आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी वेगानं काम करेल. येणारी पाच वर्ष पुण्याच्या विकासाची नवीन उड्डाण घेईल. अशी ग्वाही देखील या सभेत बोलताना नरेंद्र मोदी यांनी पुणेकरांना दिली.
पुण्यातील पूर्व आणि पश्चिम आउटरींग रोडवर 40 हजार कोटींचा काम सुरु आहे तसेच खोपोली आणि खंडाळा मिसिंग लिंकसाठी देखील साडे सहा हजार कोटींचा काम होत आहे. महायुती सरकार राज्यात विकासकामांवर भर देत आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारचे अडीच वर्ष फक्त महायुतीचे प्रोजेक्ट रद्द करण्यात संपले. काँग्रेस आणि महाविकास आघाडीची हीच संस्कृती आहे. अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाविकास आघाडीवर केली.
काँग्रेसकडून महाराष्ट्राचा अपमान, पुण्यातून नरेंद्र मोदींचा घणाघात
तर या सभेत देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलम 370 वरून काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेसच्या काळात अनेक वर्ष देशात दोन संविधान होते मात्र आम्ही कलम 370 रद्द करून जम्मू काश्मीरमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांचा संविधान लागू केला आणि लाल चौकमध्ये तिरंगा फडकावला. मात्र पुन्हा एकदा काँग्रेस आणि त्यांचे लोक जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा 370 कलम लागू करण्याचे प्रयत्न करत आहे. असं या सभेत बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले.