आमदार सुनील शेळकेंना PM मोदींचे आशीर्वाद; निवडणुकीत विजयाचा विश्वास..
Pune News : मावळ विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार सुनील शेळके यांना काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून (PM Narendra Modi) आशीर्वाद मिळाले. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काल पीएम मोदींची पुण्यात (Pune News) जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी महाविकास आघाडी आणि काँग्रेसवर जोरदार प्रहार केली. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी यांची पुण्यातील एसपी महाविद्यालयाच्या मैदानावर जाहीर सभा झाली.
या सभेतील भाषणानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पंतप्रधान मोदी यांना शेळके यांची औपचारिक ओळख करून दिली. त्यावेळी नतमस्तक होऊन शेळके यांनी मोदी यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर हस्तांदोलन करत पंतप्रधानांनी शेळके यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते.
मी फक्त भावकीसाठी नाही तर गावकीसाठी काम करतो.. सुनील शेळकेंचा भेगडेंवर हल्लाबोल
मावळमध्ये भाजपचे काही नेते महायुतीचे उमेदवार असलेल्या शेळके यांच्या विरोधात काम करीत आहेत. त्यामुळे सुरुवातीला भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते व मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. महाविकास आघाडीने अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांना पाठिंबा दिल्यानंतर मात्र चित्र बदलले. भाजपचे बहुतांश कार्यकर्ते आता शेळके यांच्या प्रचारात सहभागी झाले आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या आशीर्वादामुळे तालुक्यातील भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना व मतदारांना योग्य तो संदेश गेल्याचे मानण्यात येत आहे.
पुण्याच्या विकासाची मोदींकडून गॅरंटी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या विचारांचं पुण्याने नेहमीच समर्थन केलं आहे. भाजप आणि पुण्याचं नातं विचार आणि आस्थेचं नातं आहे. आज ज्या कंपन्यांना भारतात गुंतवणूक करण्यास इच्छुक आहेत. त्यांच्या आवडत्या ठिकाणात पुण्याचा समावेश असतो. महायुती सरकारने पुण्यात मेट्रोचा विस्तार केला आहे. स्वारगेट-कात्रज सेक्शनमध्ये मेट्रोचं काम वेगाने पुढं जात आहे.
आमचे सरकार इन्ट्रासिटी आणि इंटरसिटी कनेक्टिविटीसाठी प्रयत्न करत आहे. मिसिंग लिंक एक्सप्रेस वे वरील आणि पुण्याच्या रिंग रोडचे काम सुरू करण्यात आले आहे. आम्ही आयटी हब पुण्याला देशातील पहिले कनेक्टीव्हीटी शहर बनवणार आहे. आज मी तुम्हाला विश्वास देतो की महायुतीचं नवीन सरकार आणखी वेगानं पुण्याच्या आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करेल. येणारी पाच वर्षे पुण्याच्या विकासाची नवीन उड्डाण घेईल.
Sunil Shelke : तेव्हा भाजपसोबत जाण्यास रोहित पवार तयार होते.. अजितदादा गटाच्या आमदाराचा गौप्यस्फोट