जलसंपदा विभागाचे मुख्यालय पुण्यातून हलविले ! आता कोल्हापूर, सोलापूरमध्ये मुख्य कार्यालये
Radhakrishna Vikhe Patil-महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अखत्यरित येणारे पुण्यातील जलसंपदा विभागाचे प्रदेश कार्यालयांच्या मुख्यालयांचे आता स्थलांतर झाले आहे.
पुणे: महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अखत्यरित येणारे पुण्यातील जलसंपदा विभागाचे प्रदेश कार्यालयांच्या मुख्यालयांचे आता स्थलांतर झाले आहे. जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंताचे नवीन मुख्यालय कोल्हापूर असणार आहे. तर विशेष प्रकल्पांचे मुख्य अभियंता कार्यालयाचे (Maharashtra Krishna Valley Development Corporation Pune) मुख्यालय सोलापूरला (Solapur) असणार आहे. जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या आदेशाने हे बदल झाले आहे. प्रशासकीय सुसुत्रता आणण्यासाठी हे बदल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
कमालच झाली! आता मेंढ्यांच्या लोकरीने जोडली जाणार माणसांची तुटलेली हाडं; शास्त्रज्ञांचा मोठा शोध
पुणे पाटबंधारे अधीक्षक अभियंता या कार्यालयाचे स्थलांतर पुण्यातच मध्यवर्ती इमारतीमध्ये करण्यात आले आहे. तर टेंभू उपसा सिंचन प्रकल्प विभाग हा सांगलीमधून विटा येथे स्थलांतरीत करण्यात आला आहे. तर ताकारी म्हैसाळ उपसा सिंचन व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता कार्यालय हे सांगलीतून कवठे महांकाळ येथे, तर म्हैसाळ पंपगृह विभाग कार्यालय सांगलीतून जतला स्थलांतरीत करण्यात आले आहे. तर पुण्यातील खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता कार्यालय पुण्यातून स्वारगेट येथे स्थलांतरीत करण्यात आले आहे.
भीमाशंकर नक्की कुणाचं? राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये वाद पेटला? कारण काय?
कार्यालयाच्या कामकाजात सुसुत्रता आणण्यासाठी निर्णय
जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे यांनी सिंचन व्यवस्थापनेच्या कामात सुसुत्रता आणण्याच्या दृष्टीने काही आदेश दिले होते. ज्या प्रकल्पांचे बांधकाम ज्या कार्यालयाचे नियंत्रणाखाली आहे, त्याच मंडळाकडे त्या प्रकल्पांचे अन्वेषण, संकल्पन, भूसंपादन, पुनर्वसन, बांधकाम, सिंचन व्यवस्थापन व देखभाल दुरुस्ती देण्याबाबत आदेश दिले होते. त्यानुसार महामंडळाने विभागाचे कार्यक्षेत्र निश्चित करण्याचे आदेश काढले होत्े. त्यानुसार कार्यालयांचे स्थलांतर होत आहे.
1 जूनपासून अधिकारी, कर्मचाऱ्यांना नव्या मुख्यालयात जावे लागणार
या विभागाचे अधिकारी यांना आता 1 जूनपासून नवीन मुख्यालया कामकाज सुरू करायचे आहे. त्यामुळे आता मुख्य अभियंता यांना सोलापूर, कोल्हापूरमध्ये जावून कामकाज करावे लागणार आहे.