पुणे बाजार समिती सभापतीपदी दिलीप काळभोर, उपसभापतीपदी रवींद्र कंद बिनविरोध

पुणे बाजार समिती सभापतीपदी दिलीप काळभोर, उपसभापतीपदी रवींद्र कंद बिनविरोध

Pune APMC : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Pune APMC) सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार दिलीप काळभोर (Dilip Kalbhor) तर उपसभापतीपदी भारतीय जनता पार्टीचे रवींद्र कंद (Ravindra Kand) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीनंतर बाजार समितीत आता काळभोर आणि कंद यांची नवी इनिंग सुरू झाली आहे. भाजपाचे रवींद्र कंद पहिल्यांदाच उपसभापती म्हणून निवडून आले आहेत.

जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवडणुकीत सभापती पदासाठी दिलीप काळभोर तर उपसभापती पदासाठी रवींद्र कंद या दोघांचेच अर्ज आले होते त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी जगताप यांनी दोघांची बिनविरोध निवड जाहीर केली.

चंद्रशेखर बावनकुळे-गौरव बापट भेट, भाजपचा पुण्याचा उमेदवार ठरला?

राज्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका पार पडल्या. यामध्ये पुणे बाजार समितीच्या निवडणुकीकडे लक्ष लागले होते. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे कंद आणि पीडीसीसीचे संचालक विकास दांगट यांच्या नेतृत्वातील अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीने 13 जागा जिंकल्या होत्या. तर राष्ट्रवादीच्या अण्णासाहेब मगर सहकार पॅनलला अवघ्या 2 जागा मिळाल्या होत्या.

व्यापारी व हमाल-मापाडी मतदारसंघातून तीन उमेदवार स्वतंत्रपणे निवडून आले. यामध्ये व्यापारी आडते संघातून गणेश घुले, अनिरुद्ध भोसले तर हमाल मापाडीमधून संतोष नांगरे हे संचालक झाले आहेत.

Panama Papers : सीरमचे संचालकांवर ईडीची कारवाई, 41.64 कोटींची मालमत्ता जप्त

या निवडीनंतर सभापती दिलीप काळभोर आणि उपसभापती रवींद्र कंद यांच्या समर्थकांनी जल्लोष केला. काळभोर व कंद यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी बाजार समिती परिसरातून विजयी उमेदवारांची मिरवणूक काढण्यात आली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube