सुनेत्रा पवार अन् धंगेकरांची अचानक भेट; सुसंस्कृत राजकारणाच्या पुणे पॅटर्नचा आला प्रत्यय
Lok Sabha Elections 2024 : बारामती आणि पुणे दोन चर्चेतील मतदारसंघ. बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार महायुतीच्या उमेदवार. तर पुणे लोकसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर महाविकास आघाडीचे उमेदवार. या दोन्ही उमेदवारांची आज सकाळी भेट होते. राजकारणात या भेटीची जोरदार चर्चा होत आहे. या दोन्ही उमेदवारांनी एकमेकांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. काही काळ संवादही साधला. यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. राज्यात अजूनही सुसंस्कृत राजकारण जिवंत आहे याचाही प्रत्यय या भेटीतून आला.
फडणवीसांनी चहापानावरच साधला डाव; सुप्रिया सुळेंचे प्रचारप्रमुख माने अजितदादांच्या गोटात
पुणे लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. मतदारसंघातील नागरिकांच्या गाठीभेटी ते घेत आहेत. मतदारांशी संवाद साधत आहेत. आज त्यांची आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांची तुळजाई टेकडी परिसरात भेट झाली. दोन्ही विरोधी पक्षांचे उमेदवार समोरासमोर आल्यानंतर एकमेकांना अभिवादन, संवाद या गोष्टी आता दुर्मिळ झाल्या आहेत.
परंतु, रवींद्र धंगेकर आणि सुनेत्राताई पवार यांनी मात्र हास्य वदनाने एकमेकांना नमस्कार केला. निवडणुकीच्या शुभेच्छा दिल्या. काही काळ संवादही झाला. येथे उपस्थित कार्यकर्त्यांबरोबर फोटोही काढण्यात आले. यावेळी आमदार भीमराव अण्णा तापकीर, दत्ता धनकवडे, आप्पा रेणूसे यांच्यासह महायुतीच्या सर्वच नेते पदाधिकाऱ्यांशी त्यांनी खेळीमेळीने संवाद साधला. सुसंस्कृत पुणे शहराची परंपरा तुळजाई टेकडीवर उजळली ती अशी.. या शब्दांत कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
बारामतीचं मिटलं आता दिंडोरीत बंडखोरीचे धक्के; भाजप नेत्याच्या ‘पॉलिटिक्स’ने वाढली डोकेदुखी