‘CM पदाची संधी नाकारली, त्याचवेळी बंड करायला हवं होतं’; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार यांच्यावर (Ajit Pawar) अजूनही टीका होत असते. या वयात शरद पवारांना सोडायला नको होतं असे शब्दही कानी पडत असतात. याच चर्चांवर अजित पवार यांनी पुन्हा एकदा भूमिका स्पष्ट केली. मी शरद पवार साहेबांना कधीच (Sharad Pawar) सोडलं नाही. 2004 मध्ये मला मुख्यमंत्रिपदाची संधी नाकारली गेली. खरंतर त्याचवेळी मी बंड करायला हवं होतं, असे अजित पवार यांनी एका प्रचार मेळाव्यात स्पष्ट केले.
अजित पवार पुढे म्हणाले, राजकारणाच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत ते म्हणतील तीच पूर्व दिशा असं समजून काम केलं. पुढे त्यांनी राजकारणात वसंतदादांचं सरकार पाडून पुलोद सरकार बनवलं. त्यावेळी यशवंतराव चव्हाणांचंही त्यांनी (शरद पवार) ऐकलं नाही. सातत्याने भूमिका बदलतच राहिले. 2014 मध्ये भारतीय जनता पार्टीला बाहेरून पाठिंबा राष्ट्रवादी काँग्रेस देणार होती असे सांगितले गेले होते. त्यावेळी पक्षाची ती एक स्ट्रॅटेजी होती अशी वक्तव्य शरद पवार गटाचे नेते देत असतात.
Ajit Pawar शब्द देत नाही, पण दिला तर कुणाच्या बापाचं ऐकत नाही; अजितदादांचा मतदारांना शब्द
यावरही अजितदादांनी भाष्य केलं. म्हणजे त्यांनी केलं ती पक्षाची स्ट्रॅटेजी आणि आम्ही केली ती गद्दारी आणि वाटोळं असं कसं, असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला. आता अजित पवार यांच्या या टीकेला शरद पवार गटाचे नेते काय उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. अजित पवार यांनी याआधीही राष्ट्रवादी काँग्रेसमधून का बाहेर पडलो याचा खुलासा केला होता. आता पुन्हा एकदा त्याच गोष्टी समोर येऊ लागल्याने अजितदादांनी प्रतिक्रिया दिली.