मंत्री दिलीप वळसे पाटलांचा हात फ्रॅक्चर; पु्ण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू
Pune News : लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरू असतानाच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी काळजीत टाकणारी बातमी आली आहे. राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Valse Patil) आज त्यांच्याच घरात पाय घसरून पडले. यामुळे त्यांच्या खु्ब्याला मार लागला आहे. हातही फ्रॅक्चर झाला आहे. या घटनेनंतर त्यांना तातडीने पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, त्यांच्यावर आता शस्त्रक्रिया केली जाणार असल्याचीही माहिती मिळत आहे.
Mahadev Jankar : ‘परभणी’ की ‘माढा’? जानकरांचं ठरलं! दोन्ही मतदारसंघात ठोकणार शड्डू
दिलीप वळसे पाटील आज त्यांच्याच घरात पाय घसरुन पडले आहेत. या घटनेत त्यांच्या हात आणि खुब्याला जबर मार बसला. त्यांचा हात फ्रॅक्चर झाल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर त्यांना तातडीने औंध येथील एका खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. येथील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना अॅडमिट करण्यात आले. आता त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. तसेच डॉक्टरांनी त्यांना दोन महिने आऱाम करण्याचा सल्ला दिला आहे.