भयानक! जमिनीच्या वादातून तरुणीला गाडण्याचा प्रयत्न; चार जणांवर गुन्हा दाखल

भयानक! जमिनीच्या वादातून तरुणीला गाडण्याचा प्रयत्न; चार जणांवर गुन्हा दाखल

Pune News : पुण्यात गुन्हेगारीच्या घटना वाढीस लागल्या आहेत. कल्याणीनगर भागातील अपघाताची घटना ताजी असतानाच आता अंगाचा थरकाप उडविणारी घटना समोर आली आहे. पुण्यातील राजगड कोंढावळे गावात जमिनीच्या वादातून एका बावीस वर्षीय तरुणीला जमिनीत गाडण्याचा प्रयत्न झाला आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या घटनेची दखल घेत चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमिनीत खड्डा खणून ट्रॅक्टर आणि जेसीबीतून जमिनीत गाडण्याचा प्रयत्न झाला. याप्रकरणी पीडित तरुणीच्या आईने पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दिली होती. त्यानुसार राजगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पुणे अपघात! डॉ. तावरेंचा मोठा खुलासा; म्हणाले, ब्लड सॅम्पल कचऱ्यात फेकलं नाही 

कोंढवळे गावात जमिनीच्या वादातून जमिनीत गाडण्याचा प्रयत्न झाला होता असा आरोप संबंधित तरुणी आणि तिच्या आईने केला होता. न्यायप्रविष्ट असलेल्या जागेचा ताबा घेण्यासाठी आलेल्या 25 ते 30 जणांच्या जमावान जेसीबीच्या माती टाकून जमिनीत गाडण्याचा प्रयत्न केला असा आरोप तरुणीच्या कुटुंबियांनी केला. शेतात काम करत असताना काही लोक आले. आम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी ऐकलं नाही. नंतर माती टाकली त्यामुळे काहीच दिसत नव्हतं. ज्यावेळी माती बाजूला काढली तेव्हा ती आम्हाला दिसली. तिला आम्ही कसंबसं खड्ड्यातून बाहेर काढलं अशी हकीकत पीडित तरुणीच्या बहिणने सांगितली.

ही जमीन तुम्हाला देणार नाही. काय करायचे ते करा, तुम्हाला सगळ्यांना गाडून टाकू अशी धमकी गुंडांनी दिल्याचे कुटुंबियांनी सांगितले. या धक्कादायक घटनेचा एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. संबंधित काही लोक जमिनीचा ताबा घेण्यासाठी आले असता त्यांचा आणि तरुणीचा वाद झाला. त्यानंतर पोलिसांसमोरच ही घटना घडली. या घटनेनंतर पोलिसांनी सध्या चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये आणखी दहा ते बारा जणांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तसेच व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओची सत्यता तपासून पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

पुणे अपघात प्रकरणात अंधारेंचा मोठा दावा; म्हणाल्या, डॉ. तावरेंना सहाव्या मजल्याचं संरक्षण

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज