दिल्लीत अधिवेशन सोडून PM मोदी पुण्यात; काय आहे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार?

दिल्लीत अधिवेशन सोडून PM मोदी पुण्यात; काय आहे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार?

Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (1 ऑगस्ट) पुणे दौऱ्यावर येत आहे. त्यांच्या या दौऱ्याच निमित्त आहे ते लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार. मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. याशिवाय त्यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या पुढच्या टप्प्याचे उद्घाटन होणार आहे.

मात्र हा पुरस्कार नक्की कुणाला दिला जातो? असं काय आहे की या एका पुरस्कारासाठी मोदी दिल्लीहून पुण्याला येत आहेत का? कोणत्या योगदानसाठी आणि कोणाकडून हा पुरस्कार दिला जातो? आतापर्यंत किती भारतीय पंतप्रधानांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? गेल्या वर्षी या पुरस्काराने कोणाला गौरविण्यात आले? या एकाअसा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर याच सगळ्याची उत्तरे जाणून घेऊ.

टिळक पुरस्कार वितरणाला शरद पवार हे उपस्थित राहणारच ! विरोध करणाऱ्यांना रोहित पवारांनी सुनावले

यंदाचा ४१ वा लोकमान्य टिळक पुरस्कार आहे, जो पंतप्रधान मोदींना दिला जाणार आहे. 1 ऑगस्ट 2023 रोजी, लोकमान्य टिळकांच्या 103 व्या पुण्यतिथीला, टिळक स्मारक मंदिर ट्रस्ट (हिंद स्वराज संघ) यांच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त हा प्रतिष्ठेचा पुरस्कार ट्रस्टतर्फे दरवर्षी प्रदान केला जातो. अनन्य साधारण कामगिरी आणि व्यक्तिमत्त्वाला या पुरस्काराने सन्मानित करण्यात येतो.

पंतप्रधान मोदींना हा पुरस्कार का दिला जातोय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अनन्यसाधारण नेतृत्व आणि नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना वाढवण्यासाठी आणि त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे देश सातत्याने पुढे जातो.य त्यामुळे हा पुरस्कार पंतप्रधान मोदींना देण्यात येत असल्याचे टिळक स्मारक मंदिर ट्रस्ट कडून सांगण्यात येत आहे. पंतप्रधान मोदी हे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे 41 वे मानकरी ठरणार आहे.स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

PM मोदींसोबत व्यासपीठावर जाणारच! पवारांचा ‘मविआ’लाच धक्का; शिष्टमंडळाला भेटायलाही नकार

गतवर्षी कोणाला गौरविण्यात आलं होतं?

भारताची ‘मिसाईल वुमन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ शास्त्रज्ञ टेसी थॉमस यांना गेल्या वर्षी म्हणजेच 2022 च्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले होते. टेसी थॉमस यांनी अग्नी-IV आणि अग्नी-V या क्षेपणास्त्र प्रणालींसाठी प्रकल्प संचालक म्हणून केलेलं काम आणि देशाच्या संरक्षण क्षमतेत महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आलं होते.

आतापर्यंत कोण ठरले मानकरी?

पंतप्रधान मोदींपूर्वी मनमोहन सिंग, अटलबिहारी वाजपेयी, इंदिरा गांधी या माजी पंतप्रधानांना तर शरद पवार, राहुल बजाज, सायरस पूनावाला यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube