प्रेयसी असताना दुसऱ्या मुलीसोबत लग्न, हळदीच्या कार्यक्रमात ‘तीची’ एन्ट्री अन्…

सागरच्या घरी ११ मे रोजी हळदीचा कार्यक्रम रंगात आला होता. पाहुणे मंडळी जमली होती, गाणी वाजत होती. मात्र, त्याच वेळी सागरच्या 'जुन्या' प्रेयसीने तिथे एन्ट्री घेतली.

News Photo   2026 05 17T180353.131

पुण्यात एका तरुणाने लग्न होणाऱ्या (Pune) मुलीसोबत मोठा खेळ रचला होता. एका तरुणीसोबत प्रेमसंबंध असतानाही, ती माहिती लपवून दुसऱ्या तरुणीशी लग्न करण्याचा त्याचा प्रयत्न चांगलाच अंगलट आला आहे. लग्नाच्या अवघ्या काही तास आधी ‘खऱ्या’ प्रेयसीने एन्ट्री घेतली आणि नवरदेवाला थेट पोलीस कोठडीची हवा खावी लागली.

आरोपी सागर सतीश नेटके (रा. धानोरी) याने एका वधू-वर सूचक ग्रुपच्या माध्यमातून धानोरीतील एका २९ वर्षीय तरुणीशी ओळख वाढवली होती. आपण इंजिनिअर असल्याचं सांगून त्याने मुलीच्या कुटुंबीयांचा विश्वास जिंकला. १५ मार्च रोजी मोठ्या थाटामाटात साखरपुडा पार पडला, ज्यासाठी मुलीच्या वडिलांनी २ लाख रुपये खर्च केले. लग्नाची तारीख १३ मे निश्चित झाली होती आणि सर्व तयारी पूर्ण झाली होती.

आणखी एक खरात! स्वतःला बाळूमामा भासवून फसवणूक करणाऱ्या भोंदूला बेड्या; राजकीय कनेक्शन समोर येणार?

सागरच्या घरी ११ मे रोजी हळदीचा कार्यक्रम रंगात आला होता. पाहुणे मंडळी जमली होती, गाणी वाजत होती. मात्र, त्याच वेळी सागरच्या ‘जुन्या’ प्रेयसीने तिथे एन्ट्री घेतली. तिने नवरीला थेट सांगितलं की, मी सागरची गर्लफ्रेंड आहे आणि तो तुझी फसवणूक करत आहे, हे ऐकताच मुलीच्या पायाखालची जमीनच सरकली.

आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच धाडसी तरुणीने तात्काळ लग्नास नकार दिला. लग्नासाठी हॉल, केटरिंग, बस्ता आणि भेटवस्तू असा मिळून मुलीच्या कुटुंबीयांनी सुमारे ८ लाख ३५ हजार रुपये खर्च केले होते. जेव्हा त्यांनी हा खर्च आणि दागिने परत मागितले, तेव्हा सागर आणि त्याच्या कुटुंबीयांनी उद्धटपणे नकार दिला.

अखेर पीडित तरुणीने विश्रांतवाडी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत नवरदेव सागर नेटके याच्यासह त्याच्या नातेवाईकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सागरला अटक केली असून, त्याचे लग्नाचे स्वप्न आता पोलीस कोठडीत बंद आहे.

follow us