Milind Valanj Exclusive : तेव्हा अजितदादांशी पहिली भेट अन्…, मिलिंद वाळंज यांनी सांगितला ‘तो’ किस्सा

Milind Valanj Exclusive :  राज्यात 7 फेब्रूवारी रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार असून

  • Written By: Published:
Milind Valanj Exclusive

Milind Valanj Exclusive :  राज्यात 7 फेब्रूवारी रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार असून 9 फेब्रुवारीला निकाल जाहीर करण्यात येणार आहे. या निवडणुकीमध्ये मुळशी तालुक्यातील पौड-अंबडवेट जिल्हा परिषद गटाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. या गटातून कोण बाजी मारणार याबाबत अनेक तर्कविर्तक लावण्यात येत आहे. यातच पौड-अंबडवेट जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मिलिंद वाळंज यांनी लेट्सअप मराठीला एक विशेष मुलाखत दिली आहे.

या मुलाखतीमध्ये त्यांनी मुळशीमधील शैक्षणिक सुविधा, रोजगार, महिला सक्षमीकरणाबद्दलचे त्यांचे व्हिजन काय आहे? याबद्दलची भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच त्यांनी या मुलाखतीमध्ये दिवंगत नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबतची पहिली भेट कशी झाली याचा किस्सा देखील सांगितला आहे.

लेट्सअप मराठीशी (Letsupp Marathi) बोलताना मिलिंद वाळंज (Milind Valanj) म्हणाले की, मी आर्किटेक्टच्या फर्स्ट इयरला होतो तेव्हा माझा एक मित्र बारामतीचा होता आणि काही कारणाने आम्ही बारामतीला गेलो होतो. तेव्हा विद्या प्रतिष्ठानच काम सुरु होते. सकाळी 7-8 च्या सुमारास आम्ही तिथे फिरायला गेलो होतो. त्यावेळेस मी पहिल्यांदा अजितदादांना भेटलो. त्यावेळीस अजितदादांनी काही आर्किटेक्ट लोकांची मीटिंग तिथे बोलवली होती. या मीटिंगमध्ये अजितदादा त्यांना समजून सांगत होते की, कशा प्रकारे काम केलं पाहिजे. त्यावेळेस मी त्यांची कामाची स्टाईल बघितली होती.

तर आता काही दिवसांपूर्वी माझ्या उमेदवारीसाठी मुलाखत देण्यासाठी त्यांच्याकडे गेलो तेव्हा त्यांनी माझी प्रोफाईल बघितली आणि मला विचारले की, तू आर्किटेक्ट आहेस मग तू इकडे का आलास? मला या भागात काम करायचं असं मी त्यांना उत्तर दिलं होतो. ते म्हणाले की ठीक आहे. तुझा आर्किटेक्टव्हिजन तर खूप चांगला असणार आहे पण ते इम्प्लीमेंट करणं खूप गरजेच आहे.

मी जे काम करतो मी जे व्हिजन बघतो ते मी इम्प्लीमेंट करतो करतो तसं तुला भविष्यात कराव लागेल तर या क्षेत्रात प्रवेश कर आणि यानंतर जेव्हा जेव्हा मी अजितदादांना भेटलो तेव्हा तेव्हा ते मला काय आर्किटेक्ट याच नावाने बोलत होते असं या मुलाखतीमध्ये मुळशी तालुक्यातील पौड-अंबडवेट जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मिलिंद वाळंज यांनी म्हटले आहे.

संगीतातून ईश्वर दर्शन; पद्म विभूषण उस्ताद अमजद अली खान यांचे विचार-

follow us