Hardeep Singh Nijjar: कॅनडाने भारतावर खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरची हत्या केल्याचा आरोप केला आहे. एका उच्चपदस्थ भारतीय अधिकाऱ्याला देश सोडण्याचे आदेश दिले होते. त्याचवेळी भारतानेही ‘ईंट का जवाब पत्थर से’ देत प्रत्युत्तर दिले आहे. काही तासांनंतरच कॅनडाच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याला देश सोडण्याचे आदेश दिले. परराष्ट्र मंत्रालयाकडून एक निवेदन जारी करून ही माहिती देण्यात आली आहे. […]
UNESCO : भारतातील कोट्यावधी नागरिकांना अभिमान वाटावा अशी बातमी आली आहे. देशातील तीन मंदिरांना युनेस्कोच्या (UNESCO) जागतिक वारसा यादीत स्थान देण्यात आले आहे. कर्नाटक (Karnataka) राज्यातील बेलूर, हलेबिड आणि सोमनाथपुरा या मंदिरांचा युनेस्कोच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. याआधी पश्चिम बंगालमधील शांतिनिकेतनचाही या यादीत समावेश केला होता. त्यानंतर युनेस्कोने भारतातील आणखी तीन मंदिरांचा या यादीत […]
नवी दिल्ली : देशासाठी आजचा दिवस ऐतिहासिक असणार आहे. आज (19 सप्टेंबर) पासून नव्या संसदेच्या इमारतीमध्ये कामकाजाची सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे पहिल्याच दिवशी लोकसभेत बहुप्रतिक्षित असे ‘महिला आरक्षण विधेयक-2023’ मांडण्यात येणार आहे. काल (18 सप्टेंबर) केंद्रीय मंत्रिमंडळाने या विधेयकाला संमती दिली होती. त्यानंतर आता आज हे विधेयक कायदामंत्री लोकसभेत सादर करणार आहेत. (‘Women’s Reservation […]
Women Reservation Bill : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. यामध्ये मोठा निर्णय घेण्यात आला. वृत्तसंस्थेकडून मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय मंत्रिमंडळाने महिला आरक्षण विधेयकाला मंजुरी दिली आहे. लोकसभा आणि विधानसभा या मध्ये महिलांसाठी 33 टक्के जागा या विधेयकानुसार राखीव ठेवण्यात येणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून महिला आरक्षणासह अनेक विधेयकांवर चर्चा जोरात सुरू […]
MP BJP Leaders Resignation:मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसला आहे. इंदूरमध्ये भाजप नेते दिनेश मल्हार आणि प्रमोद टंडन यांनी त्यांच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. या दोन्ही नेत्यांनी काही महिन्यांपूर्वी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. इंदूरचे नेते प्रमोद टंडन हे ज्योतिरादित्य सिंधिया यांचे कट्टर समर्थक आहेत. मात्र आता त्यांनी भाजपचा राजीनामा दिल्याने […]
सनातन धर्म कधीच संपणार नाही, उलट संपवण्याची भाषा करणारेच संपणार असल्याची टोलेबाजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस कालपासून मध्यप्रदेश दौऱ्यावर असून जनआशिर्वाद यात्रेत ते सहभागी झाले होते. याचदरम्यान, जाहीर सभेत त्यांनी सनातन धर्मावरील वक्तव्यावरुन विरोधकांवर निशाणा साधला आहे. IND vs AUS: टीम इंडियाची घोषणा, रोहित-विराटला विश्रांती; अश्विनचे पुनरागमन देवेंद्र फडणवीस म्हणाले, […]