Crime : मेहबूब पानसरे हत्येप्रकरणात पोलिसांच्या हाती मोठे यश; दोन आरोपी गजाआड

Crime : मेहबूब पानसरे हत्येप्रकरणात पोलिसांच्या हाती मोठे यश; दोन आरोपी गजाआड

Mehboob Pansare Murder : राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचे निकटवर्तीय मानले जाणारे जेजुरी येथील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक मेहबूब पानसरे (Mehboob Pansare) यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे. जमिनीच्या वादातून शुक्रवारी पानसरे यांची कुऱ्हाडीने आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती. किरण परदेशी यांच्यासह त्यांचा मुलगा स्वामी परदेशी याला पोलिसांनी या हत्येप्रकरणी अटक केली. अटक केल्यानंतर पोलिसांना त्यांना न्यायालयात हजर केले असता सासवड न्यायालयाने दोघांनाही 11 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. (Nationalist Congress former corporator Mehboob Pansare murder case two people in police custody )

https://www.youtube.com/watch?v=RhZq-lPLC0s

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पानसरे यांची हत्या जमिनीच्या वादातून झाली. पानसरे यांनी चार वर्षांपूर्वी नाझरे धरणाच्या परिसरात धालेवाडी इथं जमीन खरेदी केली होती. मात्र, या जमिनीवरून परदेशी आणि पानसरे यांच्यात वाद सुरू होता. त्यातच काल (शुक्रवारी) सायंकाळच्या सुमारास मेहबूब पानसरे हे आपला पुतण्या राजू फिरोज पानसरे आणि साजिद युनूस मुलाणी यांच्यासह धालवाडीला गेले. त्यावेळी परदेशी हे ट्रॅक्टरच्या सहाय्याने जमीन नांगरत होते. त्यांनी परदेशी यांना नांगरणी करू नये, कायदेशीर वाद मिटल्यानंतर जे करायचे ते करा, असे सांगितलं. तसेच नांगरणी थांबवण्याचा प्रयत्न केला.

त्यामुळे आरोपी वनेश प्रल्हाद परदेशी, महिला आरोपी किरण वनेश परदेशी, स्वामी वनेश परदेशी, काका परदेशी आणि अज्ञात इसम पानसरे यांचं काहीही न ऐकता त्यांची हत्या केली. आरोपी वनेशने मेहबूब पानसरे यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. अन्य आरोपींनीही कोयता व पहारीने पानसरे यांच्या डोक्यावर, मानेवर व पाठीवर दहा ते पंधरा वार केले. या हल्ल्यात पानसरेंना गंभीर इजा झाली. त्यांना तातडीने पुण्याला हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटनेदरम्यान वाद मिटवण्यासाठी गेलेल्या पानसरे यांचा पुतण्या आणि आणखी एका इसमावरही आरोपींनी हल्ला केला.

हनीट्रॅपमध्ये बीएसएफ कर्मचारी, हेरगिरी करुन पाकिस्तानला माहिती पाठवली

राजु फिरोज पानसरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मेहबूब पानसरे यांच्यावर हल्ला करण्यामध्ये वनेश परदेशी, किरण परदेशी, स्वामी परदेशी, काका परदेशी व लाल शर्ट घातलेला अनोळखी व्यक्तींचा समावेश होता. दरम्यान, पोलिसांनी चौकशींती दोन संशयितांना ताब्यात घेतले असून अन्य संशयितांचा पोलिस शोध घेत आहेत. अटक केलेल्या आरोपींना कोर्टाने 11 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मेहबुब पानसरे हे माजी नगरसेवक होते. ते खंडोबा देवाचे मानकरी आणि निस्सिम भक्त होते. त्यांच्या हत्येमुळं जेजुरीतील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ उडाली. दरम्यान, आता पानसरेंच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube