भिडेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, NCP आक्रमक; कार्यकर्त्यांनी भिडेंच्या फोटोला घातला चपलांचा हार

भिडेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, NCP आक्रमक; कार्यकर्त्यांनी भिडेंच्या फोटोला घातला चपलांचा हार

पुणे: महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांचे वडील हे करमचंद गांधी नसून एक मुस्लीम जमीनदार आहेत, असं वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी अमरावतीत केलं होतं. भिडे यांच्याविरोधात राज्यभरातून संताप व्यक्त केला जात असून काँग्रेसह अनेक सामाजिक संघटनांनी भिडेंचा निषेध केला आहे. आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) कार्यकर्तेही आक्रमक झाले आहेत. आज सकाळीच पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी भिडेंच्या अटकेची मागणी करत आंदोलन केलं. (NCP anc congress protest against Sambhaji Bhide activist angry and demand for bhide arrest)

संभाजी भिडेंच्या वक्तव्याविरोधात ठिकठिकाणी निदर्शनं करण्यात येत आहेत. कुठं भिडेंच्या फोटोला चपला मारल्या जात आहेत, तर कुठं रास्ता रोको करून रोष व्यक्त केला जात आहे. पुण्यातही राष्ट्रवादी कॉंग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुण्यातील बालगंधर्व चौकात संभाजी भिडे यांच्या विरोधात आंदोलन कण्यात आलं. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी भिडेंच्या फोटोला चपलांचा हार घालून, फोटोला चपलांनी मारून  निषेध व्यक्त केला. यावेळी कार्यकर्त्यांनी भिडे यांच्या विरोधात जोरदार घोषणा देत भिडेंच्या अटकेची मागणी केली.

Hemangi Kavi : हेमांगी कवीची ‘ती’ पोस्ट चर्चेत; म्हणाली, “आई- बाबांच्या लग्नात का नव्हतो…” 

यावेळी प्रशांत जगताप यांनी सांगितले की, मनोहर भिडे ही महाराष्ट्राला लागलेली किड आहे. सांगलीच्या मनोहर भिडेने मागच्या काही काळात अनेकदा मुक्ताफळं उधळली. मनोहर भिडेला भारताचा राष्ट्रध्वज पसंत नाही, राष्ट्रगीत पसंत नाही. असं असतांना मोदी आणि फडणवीसांना भिडे हे गुरूस्थानी आहेत. त्याचं गुरुपद त्यांनाच लखलाभ. पण राष्ट्रपिता महात्मा गांधींविषयी आक्षेपार्ह विधान केलं. त्यामुळं त्यांच्या फोटोला चपलेचा हार घातला. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी भिडेवर राष्ट्रद्रोहाच गु्न्हा दाखल करावा. जर गुन्हा दाखल केला नाही तर महात्मा गांधी राज्यकर्त्यांना वंदनीय नाहीत, असा मेसेज जातो. त्यामुळं धमक असेल तर त्वरीत राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जगताप यांनी केली.

पुणे शहर काँग्रेसच्यावतीने सुद्धा भिडे यांच्या निषेध आंदोलन करण्यात आले. संभाजी भिडे, डोक्यात किडे… संभाजी भिडे आणि भरकटलेले कुत्रे… अशा प्रकारचे पोस्टर लावून आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी भिडेंच्या फोटोला जाळून निषेध केला. सतत महापुरुषाच्या विरोधात आक्रमक वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या या विकृत संभाजी भिडेला सरकारने गुन्हा दाखल करून शिक्षा करावी, भिडेंवर कारवाई न झाल्यास भविष्यात तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा काँग्रेस अध्यक्ष शहर अरविंद शिंदे यांनी दिला

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube