अजित पवार तयार असतील तर त्यांना अटीशिवाय मविआत घेऊ; अंकुश काकडेंनी स्पष्टच सांगितलं
Ankush Kakde यांनी अजित पवारांना कोणत्याही अटीशिवाय मविआघाडीमध्ये घेणार म्हणत पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर शिक्कामोर्तब केलं
NCP Sharad Pawar Leader Ankush Kakde on Both NCP together no conditions to Ajit Pawar : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. यादरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) एकत्र येण्याबाबत चर्चा जोर धरत आहेत.
1 एप्रिलपासून आयकर विभागाकडे असणार तुमचे बँक अन् ईमेल अॅक्सेस? सरकारने दिली महत्वाची माहिती
पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे अजित पवारांच्या आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची चांगली पकड असून, येथे दोन्ही पक्ष एकत्र लढणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. याचदरम्यान, आता राष्ट्रवादी शरद पवारांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मोठं विधान केलं आहे. त्यानंतर आता शरद पवार यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते अंकुश काकडे यांनी देखील अजित पवारांना कोणत्याही अटीशिवाय महाविकास आघाडीमध्ये घेणार असल्याचं म्हणत एक प्रकारे पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या मुद्द्यावर शिक्कामोर्तब केलं आहे.
काय म्हणाले अंकुश काकडे?
महाविकास आघाडी एकत्रित लढण्याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. त्यात अजित पवार सोबत येण्यास तयार असतील तर त्यांनाही महाविकास आघाडीत एकत्र घेतले जाईल. अजित पवार यांच्यासमोर कोणतीही अट घालण्यात आलेली नाही. या संदर्भातील एकत्रित बैठक सकारात्मक वातावरणात पार पडली आहे. महाविकास आघाडीतील सर्व पक्ष समविचारी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
महानगरपालिका निवडणूक ही स्थानिक पातळीवरची निवडणूक आहे. राज्यस्तरीय नेत्यांकडून कोणत्याही प्रकारच्या अटी लादल्या जाणार नाहीत. अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी ही माहिती दिली. चार ते पाच पक्ष एकत्र येत असल्याने एकाच चिन्हावर लढायचे की वेगवेगळ्या चिन्हांवर, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.
TVF ची पंचायत 4 ते द फॅमिली मॅन सीझन 3 ‘या’ ठरल्या सर्वात चर्चित ओटीटी सीरिज
आज दोन पक्षांची पहिली बैठक पार पडली आहे. लवकरच पक्षाच्या वरिष्ठ कोअर कमिटीची बैठक होणार आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेसला सोबत घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी अद्याप राजीनामा दिलेला नाही. प्रशांत जगताप त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या राजीनाम्याचा कोणताही प्रस्ताव पक्षाकडे आलेला नाही. शरद पवार आणि सुप्रिया सुळे प्रशांत जगताप यांच्याशी चर्चा करणार आहेत. निवडणुकीदरम्यान पक्षांतर्गत वाटाघाटी होत असतात.प्रत्येक पक्षाला आणि नेत्याला आपले मत मांडण्याचा अधिकार असल्याचे काकडे यांनी स्पष्ट केले.
