ज्यांना मारायचे ते वाचले अन् निष्पापांचा बळी; हिंजवडी प्रकरणात आणखी एक धक्कादायक गोष्ट समोर

New Update in Hinjewadi bus fire accident : पुण्यात कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलर या वाहनाला अचानक भीषण आग लागली होती. त्यानंतर आता या घटनेत चालकानेच ही बस पेटवली होती. अशी धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यानंतर आता या प्रकरणामध्ये आणखी एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे.
आणखी एक धक्कादायक गोष्ट समोर…
बसचा चालक जनार्दन हंबर्डीकर यांने कामगारांशी झालेला वाद आणि दिवाळीमध्ये मालकाने पगार कापल्याच्या रागातून ज्या कर्मचाऱ्यांना बसमध्येच जाळून मारण्याचा प्रयत्न केला त्यात ज्या लोकांशी त्याचा वाद होता. ते लोक यातून बचावले आहेत. कारण जेव्हा बसला आग लागली. तेव्हा कर्मचाऱ्यांनी गाडीतून उड्या मारल्या. मात्र मागे बसलेले 4 जण उड्या मारू न शकल्याने त्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. त्यामुळे त्यांचा हकनाक बळी गेला आहे.
बस पेटवण्याचे कारण काय?
या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या बसचा चालक जनार्दन हंबर्डीकर यांनीच ही बस पेटवून दिल्याच्या समोर आलं आहे. याचं कारण म्हणजे कामगारांशी झालेला वाद आणि दिवाळीमध्ये मालकाने पगार कापल्याचा राग त्याने अशा पद्धतीने बाहेर काढला आहे. त्याने कट रचून ही दुर्घटना घडवून आणली. असं पोलीस तपासात उघडकीस आले. त्याने कंपनीतून आदल्या दिवशी बेंझिन नावाचं केमिकल गाडी जाणून ठेवलं. तसेच टोनर पुसण्यासाठी लागणाऱ्या चिंध्याही त्याने गाडी ठेवल्या. हिंजवडी जवळ आल्यावर त्याने काडीपेटीची काडी पेटवून चिंध्या पेटवल्या आणि केमिकलमुळे बसमध्ये आगेचा भडक उडाला. असं पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आहे. त्याचबरोबर या आरोपीने देखील या गुन्ह्याची कबुली दिली.
नेमकी घटना काय?
कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलर या वाहनाला अचानक भीषण आग लागली. पाहता पाहता आगीने अख्ख्या वाहनाचा ताबा घेतला. समोरच्या बाजूचे कर्मचारी कसेतरी बाहेर पडले. पण आतील कर्मचाऱ्यांचे दुर्दैवच आडवे आले म्हणा, त्यांनी काही केल्या बाहेर पडता आलं नाही. आगीत होरपळून त्यांचा मृत्यू झाला. समोरील दृश्य, जीव वाचवण्यासाठीची धडपड, वाहनाचा जळून झालेा कोळसा अन् भाजलेले कर्मचारी पाहून प्रत्येकाच्याच डोळ्यात पाणी आलं.
तरुणानं हत्येनंतर थेट नाल्यात फेकला मृतदेह; प्रेयसी दुसऱ्यासोबत बोलताना दिसली म्हणून टोकाचं पाऊल
दरम्यान, या अपघातातील मृत कर्मचाऱ्यांची ओळख पटली आहे. या भीषण दुर्घटनेत सुभाष भोसले (वय ४२), शंकर शिंदे (वय ६०), गुरुदास लोकरे (वय ४०), राजू चव्हाण ( वय ४०) (सर्व मृत राहणार पुणे) अशी मृत्यूमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. या कर्मचाऱ्यांचा मृत्यू चटका लावणाराच आहे. पण, या वाहनाला आग लागली तरी कशी? या टेम्पो ट्रॅव्हलरचे मेंटेनन्स झाले नव्हते का असे प्रश्न अनेकांना पडले आहेत. याच प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. प्रदीप राऊत, प्रवीण निकम, चंद्रकांत मलजीत, संदीप शिंदे, विश्वनाथ झोरी आणि टेम्पो चालक जनार्दन हंबारडीकर अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.