‘गृहमंत्र्यांचा कलगीतुला सुरु’; पुण्यातील घटनेनंतर अजितदादा फडणवीसांवर संतापले

‘गृहमंत्र्यांचा कलगीतुला सुरु’; पुण्यातील घटनेनंतर अजितदादा फडणवीसांवर संतापले

Ajit Pawar On Pune MPSC Student Atttack :  पुण्यात एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला असून या हल्ल्यामध्ये ती  सुदैवाने वाचली आहे.  यामुळे ही  दुर्घटना टळली आहे. भरदिवसा पुण्यातील सदाशिव पेठ या गजबजलेल्या भागामध्ये ही घटना घडली. प्रेमाला नकार दिलेल्या या तरूणाने तरूणीचा पाठलाग करत भर दिवसा कोयत्याने तिच्यावर प्राणघातक हल्ला केला. काही दिवसांपूर्वीच एमपीएससी परिक्षेत तिसऱ्या क्रमांकाने पास झालेली दर्शन पवार हीची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर भरदिवसा पुण्यात ही घटना घडली आहे. यावर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ट्विट करत तीव्र शब्दात या घटनेचा निषेध केला आहे.

अजित पवार म्हणाले की, विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात फोफावल्याचं चित्र आहे. गुन्हेगारांवर कायद्याचा अजिबात वचक राहिला नसल्याचं दिसतंय. दिवसाढवळ्या विद्यार्थिनींवर कोयत्यानं हल्ले होत आहेत. गृहमंत्र्यांनाही बहुधा राजकीय कलगीतुऱ्यातून कायदा व सुव्यव्यस्था हाताळण्यास वेळ मिळत नसावा, असे म्हणत त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुनावले आहे.

MPSC Student : दर्शना पवार हत्याकांडाची पुनरावृत्ती? पुण्यात एमपीएससी विद्यार्थिनीवर प्राणघातक हल्ला

तसेच सुसंस्कृत म्हणून पूर्वापार ख्याती असलेलं पुणे इतकं हिंस्त्र झालेलं यापूर्वी कधीच पाहिलं नाही. या घटनेचा मी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करतो, असे म्हणत अजित पवारांनी या घटनेवर आपला रोष व्यक्त केला. या घटनेमुळे राज्यात कायदा अन् सुव्यवस्था राहिली आहे की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

भाजप की काँग्रेस… बीआरएस कोणाची टीम? केसीआर यांनी अखेर पक्षाचं नावचं सांगितलं!

दरम्यान, भरदिवसा पुण्यातील सदाशिव पेठ या गजबजलेल्या भागामध्ये आज ( 27 जून ) रोजी ही घटना घडली. प्रेमाला नकार दिलेल्या या तरूणाने तरूणीचा पाठलाग करत भर दिवसा कोयत्याने तिच्यावर प्राणघातक हल्ला केला. भर रस्त्यावरच हा भयावय प्रकार सुरू असताना या तरूणीच्या मदतीला सुरूवातीला कोणीही आलं नाही. मात्र लेशपाल जवळगे या तरूणाने धाडस करून हल्ला करणाऱ्या तरूणाल रोखलं आणि सुदैवाने तिचे प्राण बचावले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube