Puneshwar temple : ‘अन्यथा आम्हीच मज्जीद पाडू’; पुण्येश्वर मंदिराचा मुद्दा पेटला, लांडगेंनी दिला ४८ तासांचा अल्टिमेटम

  • Written By: Published:
Puneshwar temple : ‘अन्यथा आम्हीच मज्जीद पाडू’; पुण्येश्वर मंदिराचा मुद्दा पेटला, लांडगेंनी दिला ४८ तासांचा अल्टिमेटम

Puneshwar temple : पुणे शहरातील पुण्येश्वर मंदिराच्या (Puneshwar temple) अतिक्रमणाविरोधात हिंदुत्ववादी संघटना आज पुन्हा आक्रमक झाल्या आहेत. भाजपसह अन्य काही हिंदू संघटनांच्यावतीने पुणे महापालिका (Pune Municipality) आयुक्त विक्रम कुमार यांच्या दालनाबाहेर आदोलंन करण्यात आलं. यावेळी भाजप आमदार महेश लांडगे यांनी पालिका आयुक्तांना ४८ तासांचा अल्टिमेटम दिला. आयुक्तांनी काहीही कारवाई केली नाही तर आम्ही मज्जीद पाडून टाकू, असा इशारा त्यांनी दिला.

https://www.youtube.com/watch?v=TWoD7CRKg80

यावेळी महेश लांडगे म्हणाले की, पुणे शहराला पुण्येश्वर मंदिरामुळं ओळख आहे. आज या मंदिर परिसरात अतिक्रमण होतेय. इथं चार मजली मज्जीद बांधली गेली. ही मज्जीद पाडायला आम्हाला हातोड्याची गरज नाही. आम्ही शिवरायांचे मावळे आहोत. अनधिकृत मशीदीचं काम सुरू आहे, ते पाडायचे कोर्टाने आदेश दिले आहेत. आम्ही महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना 48 तासांची मुदत देतो. आयुक्तांनी जर कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी केली नाही तर पुण्यात होणाऱ्या घटनांची जबाबदारी आयुक्तांची असेल. जर आम्ही सगळे अयोध्याला जाऊन बाबरी मशीद पाडू शकतो तर आम्ही पुण्यश्वर जवळील मज्जीदही पाडू शकतो, असा इशारा त्यांनी दिला.

अजितदादांना दोन्ही बंडात साथ; आता 2024 चा पेपर अवघड; अण्णा बनसोडे पदाधिकाऱ्यांना नकोसे? 

ते म्हणाले, जर कोंढवा, हडपसर अतिरेकी गंभीर हत्यारे घेऊन फिरत असतील, पुणे शहराची शांतता भंग करण्याचा प्रयत्न कर असतील तर त्यांना त्यांच्याच भाषेत घोडा लावण्याची आमची तयारी आहे.

यावेळी नितेश राणे म्हणाले, पोलीस 100 आहेत आणि आम्ही किती आहोत हे आयुक्तांनी लक्षात घ्यावं. कायदा आम्ही तोडत नाही. मात्र, आमच्यावर तशी वेळ आणू नका. मी आणि लांडगेनी विधानसभेत तोंड उघडलं तर दोन मिनिटं खुर्ची घालायला लागणार नाही. आयुक्त, बांधकाम विभागाला आदेश आले आहेत. त्यामुळे त्यांनी ते काम करावं. तुम्ही कुणाला वाचवत आहात? असा सवाल राणेंनी केला.

हा हिंदूंचा देश आहे. आमचा इतिहास माहिती नसेल तर अयोध्येला जाऊन बघा. लांडगे घोडा म्हणाले, कुणी हातोडे म्हणाले मात्र, आपलं थेट कापणं असतं. तुम्ही कितीही झुंबर लावा, कितीही हिरवा रंग लावा. पण तिथे भगवाच लागणार. मला एक वीट पाडायची संधी हवी होती. मात्र आता पुण्येश्वराची संधी मिळणार. माझ्यावर कुठलीही कारवाई होणार नाही. कारण आपलं सरकार आहे, असंही राणे म्हणाले.

आई भवानी शक्ती दे, पुण्येश्वरला मुक्ती दे, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, जय पुण्यश्वर अशा घोषणा यावेळी आंदोलकानी दिल्या. यावेळी समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे आदी उपस्थित होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube