आमच्या कंपनीच्या उत्पादनावर परिणाम होतोय; रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे उद्योजक चाकणमधल्या कंपन्या हलविणार?
Chakan MIDC entrepreneurs questioned government over road चाकणमधील उद्योजकांनी या रस्त्यांच्या दुरावस्थेवरून सरकारला सवाल केला आहे.
Our company’s production affected Chakan entrepreneurs questioned government over poor condition of roads : पुण्यातील चाकण एमआयडीसीतील अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था झाल्याने तेथील कर्मचाऱ्यांसह कंपन्यांना देखील याचा मोठा फटका बसत आहे. त्यामुळे चाकणमधील उद्योजकांनी या रस्त्यांच्या दुरावस्थेवरून सरकारला सवाल केला आहे. तसेच आपल्या कंपन्यांच्या उत्पादनावर परिणाम होत असल्याची तक्रार त्यांनी यावेळी केली.
रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे उद्योजक चाकणमधल्या कंपन्या हलविणार?
या पत्रकार परिषदेत बोलताना उद्योजक म्हणाले आहेत की, आमच्यासर्व लघु उद्योगांची हजार एक कोटींची उलाढाल आहे. या कंपन्यांना रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे नुकसान सहन करावं लागत आहे. त्यामुळे आम्ही चाकणमदील कंपन्या हलवल्या आहेत. त्याचा फटका 40 हजारहून अधिक कर्मचाऱ्यांना बसला आहे. दरम्यान या चाकण एमआयडीसीचा कारभर अनेक खात्यांकडे असल्याने त्या रस्त्यांची जबाबदारी नेमकी कुणाची हे स्पष्ट होत कळत नाही. त्यामुळे आम्ही गेल्या दोन वर्षांत थेट मुख्यमंत्र्यांना अनेकदा पत्रव्यवहार केला आहे. त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. ही पत्र इथे आणली आहेत.
टाटा समूहात महत्त्वाची घडामोड; एन. चंद्रशेखरन अध्यक्षपदावरून पायउतार, एस. पद्मनाभन यांची नियुक्ती
या रस्त्यांवर पाणी, खड्डे, त्याची दुरूस्ती होत नाही, एमआयडीसी, पीएमआरडीए आणि एनएचआय हे एकमेकांकडे जबाबदारी ढकलत आहे. या सर्वांचा परिणाम आमच्या कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर आणि अंतिमत: आमच्या उत्पादनावर होत आहे. त्यामुळे आम्ही आमच्या या व्यथा मांडत आहोत. तसेच येथे मल्टीनॅशनल कंपन्या देखील आल्या आहेत. त्यांचं म्हणण आहे की, आम्ही चाकणमधून शिफ्ट होणार असल्याचं येथेच जाहीर करणार आहोत.
Share Market : चंद्रशेखरन यांच्या राजीनाम्याची बातमी येताच TCS सह टाटा कंपन्यांचे शेअर्स घसरले
त्यानंतर त्यांनी पु्न्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना त्यांनी अश्वासन दिल्या प्रमाणे रस्ते करून देण्याचं आवाहन केलं. अन्यथा आम्ही चाकणमधून शिफ्ट होणार असल्याचं देखील त्यांनी इशारा दिला आहे. मात्र जर असं झालं तर अगोदरच राज्यावर बेरोजगारीचं संकट असताना आता आणखी कर्मचारी आणि कामगारांवर कुऱ्हाड पडेल एवढं मात्र नक्की.