पुणे : शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाची स्थापना करण्यात आली आणि या पक्षात जोरदार इनकमिंग सुरु असल्याचं चित्र आजघडीला पाहायला मिळत आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी पुण्यात आधीच ठाकरे गट, मनसेच्या पदाधिकाऱ्यांना गळाला लावलेले असताना आता शिंदे यांनी आपला मोर्चा राष्ट्रवादीकडे वळवत पुण्यात राष्ट्रवादीलाच धक्का दिला आहे. […]