वाकड-ताथवडे-पुनावळेत परिवर्तनाची लाट; भाजप उमेदवार श्रुती वाकडकर यांचा झंझावाती जनसंपर्क
PCMC Election 2026 : प्रभाग क्रमांक 25 'क' मधील भाजपच्या (BJP) अधिकृत उमेदवार श्रुती राम वाकडकर यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे.
PCMC Election 2026 : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC Election 2026) निवडणुकीसाठी जोरदार प्रचार सुरू आहे. प्रभाग क्रमांक 25 ‘क’ मधील भाजपच्या (BJP) अधिकृत उमेदवार श्रुती राम वाकडकर (Shruti Wakadkar) यांनी आपल्या प्रचाराचा धडाका लावला आहे. वाकड, ताथवडे आणि पुनावळे या भागातील विविध सोसायट्यांमध्ये जाऊन त्यांनी नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी त्यांनी केवळ आश्वासनं न देता, स्थानिक समस्या समजून घेऊन त्या लवकरात लवकर सोडवण्याचा शब्द दिल्याने सर्वच स्तरातून त्यांना मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.
तरुणांचा उत्साह आणि ज्येष्ठांचे आशीर्वाद
प्रचारादरम्यान श्रुती वाकडकर यांचा दांडगा जनसंपर्क दिसून येत आहे. त्यांच्या रॅली आणि बैठकींमध्ये तरुणांचा वाढता उत्साह, ज्येष्ठ नागरिकांनी दिलेले आशीर्वाद आणि महिला वर्गाचा उत्स्फूर्त सहभाग यांमुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. “जनतेचा प्रेमळ प्रतिसाद आणि वाढता पाठिंबा पाहता, आपण 100 टक्के निवडून येऊ, असा ठाम विश्वास वाकडकर यांनी यावेळी व्यक्त केला.
”महिलांच्या समस्यांवर ठोस कृती करणार!”
“प्रभागातील महिलांशी संवाद साधताना त्यांचे आरोग्य आणि घरगुती प्रश्न गंभीर असल्याचे जाणवले. या समस्यांवर केवळ आश्वासने न देता ठोस उपाययोजना करण्याचे मी त्यांना वचन दिले आहे. जनतेचा हा उत्स्फूर्त प्रतिसादच माझ्या विजयाची पोचपावती आहे, असे श्रुती राम वाकडकर यांनी म्हटले आहे.
गिरणी कामगार हद्दपार कोणामुळे, हे पाप कोणाचं? CM फडणवीसांचा ठाकरेंवर घणाघात
विकासाचा ‘रोडमॅप’ आणि प्रमुख आश्वासने
श्रुती वाकडकर यांनी प्रभागातील प्रलंबित प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांनी नागरिकांना खालील प्रमुख कामांचे आश्वासन दिले आहे.
पाणी आणि रस्ते:- प्रभागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था प्राधान्याने दूर करणार.
महिला सुरक्षा व आरोग्य: -महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि आरोग्यासाठी ठोस उपाययोजना राबवणार.
सर्वांगीण विकास: -आधुनिक सोयीसुविधांनी युक्त असा आदर्श प्रभाग घडवण्याचा ध्यास.
प्रचारात या पाच गोष्टी ठरतायत जमेची बाजू
1. विकासाभिमुख दृष्टीकोन: भविष्यातील गरजांचे योग्य नियोजन.
2. संघटनात्मक अनुभव: प्रदीर्घ समाजकार्याचा दांडगा अनुभव.
3. थेट संवाद: समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याची वृत्ती.
4. स्थानिक प्रश्नांची जाण: प्रभागातील प्रत्येक गल्ली आणि समस्येची सखोल माहिती.
5. महिला नेतृत्व: महिलांच्या प्रश्नांना खंबीरपणे वाचा फोडणारे नेतृत्व.
