PMRDA : तानाजी सावंत आणि संजय राऊत यांच्या हकालपट्टीची मागणी

PMRDA : तानाजी सावंत आणि संजय राऊत यांच्या हकालपट्टीची मागणी

PMRDA : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणावर (पीएमआरडीए) खासदार संजय राऊत आणि आपल्या मंत्रिमंडळातील आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची निवड महाविकास आघाडी सरकारने केली होती. ती संपूर्णपणे बेकायदेशीर आहे. या दोन सदस्यांची नेमणूक तातडीने रद्द करावी. या दोन्ही व्यक्तींचा पुणे महानगर विकास प्राधिकरणाशी कायद्याच्या द्वारे अभिप्रेत असलेला संबंध नाही. त्यामुळे त्यांची तातडीने हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पुणे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर आणि सुहास कुलकर्णी यांनी केली आहे.

महानगर नियोजन प्राधिकरण कलम ४ (१) तयार करण्याबाबत आणि पूर्वीचे नियमबाह्य सदस्य वगळावे तसेच अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे.

अजितदादांना कसं ट्रॅक कराल?; सुप्रिया सुळेंनी दिली आयाडिया! – Letsupp

उज्ज्वल केसकर आणि सुहास कुलकर्णी यांनी सांगितले की, पीएमआरडीएच्या कलम २८ द्वारे निर्माण केलेल्या नियोजन समितीने आपला अहवाल सादर केला आहे. ही समिती चुकीची आणि बेकायदेशीर गठित झाली आहे असा आमचा आक्षेप आहे आणि तो आक्षेप आम्ही नोंदवलेला आहे. या समितीने जो अहवाल दिला तो अहवाल पीएमआरडीएच्या संकेतस्थळावर (वेबसाईटवर) टाकण्यात यावा.

नियोजन समितीने सादर केलेल्या अहवाल त्या अहवालाप्रमाणे प्रारूप विकास आराखड्यामध्ये बदल करणे अपेक्षित असताना तसे न करता अहवाल दाबून घेऊन हवे तसे बदल करण्याचा सपाटा अधिकाऱ्याने पीएमआरडीएमध्ये लावला आहे. त्यामुळे याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने दखल घेत कार्यवाही करावी, अशी मागणी उज्ज्वल केसकर आणि सुहास कुलकर्णी यांनी केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube