Prakash Ambedkar खळबळजनक वक्तव्य; म्हणाले, मोदींना तुरुंगात…

Prakash Ambedkar खळबळजनक वक्तव्य; म्हणाले, मोदींना तुरुंगात…

पुणे : २०२४ मध्ये बिगर भाजपा-आरएसएसचे सरकार येऊ द्या. नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही. या देशाचा मालक असलेला मतदार यांच्या भीतीपोटी नोकर झालाय, आणि नोकर मालक झालाय, अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली. पुढील आगामी काळात ही भीती आपल्याला दूर करायची आहे. आज या सभेच्या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने आपण जमलो आहोत. जर याठिकाणी बीबीसीचा वृत्तपट (BBC documentary) आपण दाखवला असता तर सर्वांनाच पोलिस पकडू शकणार का ? जर पकडले तरी एवढ्या लोकांना ठेवायला तुरुंगात जागा आहे का ? झुकाने वाला चाहीये, सरकार झुकती है, असे म्हणत २०२४ मध्ये यांना झुकवा, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी (Prakash Ambedkar) यावेळी केले.

पुण्यात खडकवासला येथे आयोजित केलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या सभेत ते बोलत होते. माजी पंतप्रधान नरसिंहराव यांच्या काळात देशात सोनं बँक ऑफ इंग्लंडमध्ये गहाण ठेवले होते. मी खूपवेळा त्यांना विचारलं ते सोनं परत आणलं का ? पण यावर कुणी उत्तर देत नव्हतं. यावरुन आपल्या देशाची परिस्थिती काय आहे ते बघा. आपल्या घरातलं सोनं जेव्हा आपण गहाण ठेवतो आणि ते सोडवता येत नाही. यावरुन आपले देश आर्थिकदृष्ट्या किती प्रमाणात दुबळे असल्याचा निष्कर्ष काढला जातो.

एखादा दारूडा अशावेळी घरातली भांडीकुंडी विकून घर चालवत असतो. सगळं विकून झालं की दारूडा आपलं घर देखील विकून टाकतो. आज नरेंद्र मोदी नेमकं तेच करत आहेत कि नाही ? असा सवाल उपस्थित करत प्रकाश आंबेडकर यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी पंडीत जवाहरलाल नेहरू यांचे मात्र कौतुक केले. नेहरू यांनी अत्यंत कष्टाने देश उभा केला असे सांगत ते म्हणाले की, डॉ. होमी भाभा यांच्या संशोधनाच्या आधारावर नेहरूंनी देशात कारखाने उभा करण्याचा प्रयत्न केला. तेच कारखाने आज भारताचा आर्थिक कणा ठरत आहेत. मात्र तेच कारखाने मोदी दारूड्यासारखा विकायला लागला आहे, अशी जोरदार टीका आंबडेकर यांनी केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube