खेळ जिंकण्यापलीकडेही खूप काही शिकवतो; एसपीएफ स्पोर्ट्स मेनियात खेळाडूंना प्रोत्साहन
Promotion of sportsmen in SPF sports mania : पुण्यामध्ये सुरेंद्र पठारे फाऊंडेशन यांच्याकडून दरवर्षी स्पोर्ट्स मेनिया अंतर्गत या चॅम्पियनशिप आयोजित करण्यात येतात. त्यातून खेळाडूंना प्रोत्साहन दिले जाते. त्यात यावर्षी देखील विविध स्पर्धा पार पडल्या.
आळंदीतील वारकरी शिक्षण संस्थांमध्ये मुलांवर अत्याचार? चौकशीसाठी 20 समित्यांची स्थापना
सुरेंद्र पठारे फाऊंडेशन आयोजित एसपीएफ स्पोर्ट्स मेनिया अंतर्गत स्विमिंग चॅम्पियनशिप, बॅडमिंटन चॅम्पियनशिप तसेच व्हॉलीबॉल चॅम्पियनशिप स्पर्धा शनिवारी व रविवारी (ता. १ व २ फेब्रु.) पार पडल्या. महिला व पुरुष या दोन गटात ही स्पर्धा घेण्यात आली असून, ज्यात विविध वयोगटाचा समावेश होता. सदर स्पर्धांना खेळाडू स्पर्धकांचा मोठा प्रतिसाद लाभला. एसपीएफ स्पोर्ट्स मेनिया अंतर्गत कॅरम चॅम्पियनशिप स्पर्धा उर्वरित असून तसेच, पार पडलेल्या एकूणच स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यासाठी सुप्रसिद्ध अभिनेता व क्रीडाप्रेमी रणविजय सिंह, वरुण सुद यांची उपस्थिती लाभणार आहे.
“विविध खेळ आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत किंवा आपण ते बनवून घेतले पाहिजे. खेळात केवळ जिंकणे आणि हारणे नसून, त्याहीपलीकडे खूप काही शिकवून जाणारे असतात. शारीरिक तसेच मानसिक स्थितीत सुधार आणण्यासाठी खेळ महत्त्वाची भूमिका बजावतात. विविध खेळ खेळण्याने आरोग्य निरोगी राहण्यास मोठी मदत होते. तंदुरुस्त राहण्यासाठी तर विविध खेळ खेळणे हा सर्वोत्तम पर्याय आहे”, असे मत सुरेंद्र पठारे फाऊंडेशनचे अध्यक्ष सुरेंद्र पठारे यांनी व्यक्त केले.
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; राज्यात शेत जमिनीच्या वापरासाठीची ‘NA’ अट रद्द
स्पर्धेविषयी बोलताना सहभागी स्पर्धक म्हणाले, “या स्पर्धेत सहभागी होणे हा चांगला अनुभव होता. स्पर्धेच्याप्रसंगी असलेले नियोजन तसेच पुरवल्या गेलेल्या सुविधाही उत्तम होत्या. अनेक गोष्टी या स्पर्धेतून शिकायला मिळाल्या आणि प्रतिस्पर्धी ताकदीचे असल्याने नक्कीच आमच्या कौशल्यांचाही चांगला कस लागला.”