राज्याला हादरवून टाकणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी हत्याकांडासंबंधित मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य दोषी जितेंद्र उर्फ पप्पू बाबूलाल शिंदे याने आज पुण्यातील येरवडा कारागृहात गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. जितेंद्र उर्फ पप्पू बाबूलाल शिंदे (वय 30) कोपर्डी घटनेतील मुख्य दोषी आहे. जिल्हा न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली आहे. […]
Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे पुणे शहरात ठिकठिकाणी भावी मुख्यमंत्री उल्लेख असलेले बॅनर लागले आहेत. अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होतील अशाही चर्चा सुरू असतात. पण, बॅनरचं राजकारण काय?, मुख्यमंत्री कसं होता येतं?, भाजपसोबत जायला खरंच उशीर झाला का? या पत्रकारांच्या गुगली प्रश्नांची अजितदादांनी अगदी सेफ उत्तरं दिली. […]
Ajit Pawar On baramati Teachers : पुण्यामध्ये आज शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद शिक्षक पुरस्कार व अध्यक्ष चषक पुरस्काराचे वितरण करण्यात आले. त्याचवेळी पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले. त्यात सर्वाधिक शिरुर तालुक्यातील विद्यार्थी आहेत तर बारामती तालुक्यातील एकही विद्यार्थी गुणवत्ता […]
Ajit Pawar : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यापासून अजितदादा (Ajit Pawar) आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) या दोन्ही दादांमधील सुप्त वाद वाढतच चालला आहे. आता या वादाचा नवा अंक पुणे जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमात पाहण्यास मिळाला. यावेळी दोन्ही दादांत चांगलीच जुगलबंदी रंगल्याचं पाहण्यास मिळालं. दोघांनीही एकमेकांवर मिश्किल कोट्या करत निशाणा साधला. त्याचं झालं असं, […]
पुणे : मनसेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे सुपुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांची शहराच्या राजकारणात पहिल्यांदाच एन्ट्री झाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने मनसेने (MNS) तयारी सुरु केली असून वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडे लोकसभा मतदारसंघनिहाय जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. त्यानुसार यात पुणे लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी थेट अमित ठाकरेंच्या खांद्यावर सोपविली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या […]
Pune News : जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा निषेध आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, या मागणीसाठी पुण्यातील सकल मराठा समाजाच्यावतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आलं आहे. या आंदोलनात पुण्यातल मराठा समाज एकवटल्याचं पाहायला मिळालं. यावेळी ‘आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं’ अशा घोषणा देत मराठा समाजाने आंदोलन केलं आहे. या आंदोलनात राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे […]