Pune By-Election : पुणे पोटनिवडणुकीची तारीख बदलली, नवीन तारीख ‘ही’ असेल

  • Written By: Published:
Pune By-Election : पुणे पोटनिवडणुकीची तारीख बदलली, नवीन तारीख ‘ही’ असेल

नवी दिल्ली : पुण्यातील कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. पण या निवडणुकीच्या तारीखेमध्ये बदल करण्यात आला आहे. येत्या 27 फेब्रुवारीला ही मतदान तर 2 मार्च रोजी मतमोजणी होणार होती. पण १२ वी आणि पदवीची परीक्षा असल्यामुळे पुणे पोटनिवडणूकीची तारीख बदलण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाकडून आज नवीन वेळा जाहीर केल्या आहेत. आज जाहीर केलेल्या नवीन वेळेनुसार २६ फेब्रुवारी रोजी मतदान होईल तर २ मार्च रोजी मतमोजणी होईल. मतदानाची तारीख एक दिवस आधी केली आहे.

कसबापेठ या मतदारसंघाच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड या मतदारसंघाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे या जागा रिक्त झाल्या आहेत. या जागांवर आता पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपच्या या दोन्ही आमदारांचे कर्करोगाशी सामना करताना निधन झाले होते.

केंद्रीय निवडणुक आयोगाने ईशान्य भारतातील त्रिपुरा, मेघालय आणि नागालँडमध्ये विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या केल्या आहेत. त्रिपुरामध्ये 16 फेब्रुवारी तर मेघालय आणि नागालॅंडमध्ये 27 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीचा निकाल 2 मार्च रोजी जाहीर करण्यात येणार आहे. त्या निवडणुकीसोबतच पुण्यातील कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर केली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube