Pune : एकाचवेळी तीन हजार पालकांनी पाल्यांना सांगितली गोष्ट; चीनचा विक्रम मोडत अनोखा विक्रम
Pune : पुणे (Pune ) हे शहर म्हटलं की, त्यामागे पुणे तेथे काय उणे ही म्हणही पाठोपाठ यतेच. त्याची प्रचिती नुकतीच पुणे शहरामध्ये आली. यावेळी शहरातील तीन हजार पालकांनी आपल्या पाल्यांना एकचवेळी गोष्ट सांगण्याचा अनोखा विक्रम केला आहे. या पालकांच्या या अनोख्या विक्रमामुळे चीनचा विक्रम देखील मोडीत निघाला आहे.
Karan Johar: ‘दीपिका-रणवीर’ रिलेशनशिप स्टेटमेंटवर ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्याने दिले सडेतोड उत्तर
झालं असं की, शनिवारी 16 ते 24 डिसेंबर या कालावधीमध्ये राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर पुणे पुस्तक महोत्स आयोजित करण्यात येणार आहे. या निमित्त महापालिकेने स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर आज (14 डिसेंबरला) पालकांनी पाल्यांना गोष्टी सांगायच्या हा उपक्रम आयोजित केला होता.
‘मासिक पाळी अडचण नाही, त्यासाठी पगारी सुट्टीची गरजही नाही’; स्मृती इराणींचा विरोधी सूर
यामध्ये तब्बल 3 हजार 77 पालकांनी आपल्या पाल्यांना एकाचवेळी सलग चार मिनिटं गोष्ट सांगितली. या पालकांच्या या अनोख्या विक्रमामुळे चीनचा विक्रम देखील मोडीत निघाला आहे. या विक्रम करताच ढोल ताशांच्या गजरात देशभक्तीपर गीतांमध्ये आनंदोत्स साजरा करण्यात आला.
Mohammed Shami च्या नावाची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस; बॅडमिंटनचे दोन खेळाडूंना खेलरत्न
दरम्यान पालकांनी आपल्या पाल्यांना गोष्टी सांगायच्या हा विश्वविक्रम यापूर्वी चीनच्या नावावर होता. चीनमध्ये साधारण आठ वर्षांपूर्वी दोन हजार 479 पालकांनी एकाचवेळी आपल्या पाल्यांना गोष्टी सांगितल्या होत्या. त्यानंतर आज स. प. मैदानावर तीन हजार 77 पालकांनी एकत्रित येत, आपल्या आपल्या पाल्यांना निसर्गाचा नाश करू नका हा धडा वाचला आणि विश्वविक्रमाला गवसणी घातली.
मलायकासोबत लग्न कधी करणार? करण जोहरच्या कार्यक्रमात अर्जुन कपूरने थेटच सांगितलं
या उपक्रमामागचा हेतु असा होता की, वाचनाला चालना दिली जावी. तसेच मुलांना मोबाईलच्या व्हर्च्युअल जगातून बाहेर आणण्यात यावे. त्यांना गोष्टी ऐकण्याची सवय लागावी. यावेळी पाल्यांना निसर्गाचा नाश करू नका क्षिप्रा शहाणे यांनी लिहिलेल्या निसर्गाचा नाश करू नका या पुस्तकातील धडा वाचून दाखण्यात आला. त्यामुळे मुलांना निसर्ग संवंर्धनाचा देखील धडा देण्यात आला.
या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन पुणे महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी चोख पद्धतीने केले. या संपूर्ण उपक्रमाला उद्योजक सूर्यकांत काकडे यांचे सहकार्य लाभले. अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी उपस्थित मुलांना मार्गदर्शन करीत, त्यांना वाचन करण्याची प्रेरणा दिली. यावेळी चैतन्य कुलकर्णी यांनी मराठी गीतांच्या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सूत्रसंचालन प्राचार्य डॉ. संजय चाकणे आणि मिलिंद कुलकर्णी यांनी केले.