पुण्यात प्राध्यापकाकडून देवतांविषयी वादग्रस्त विधान, विद्यार्थी आक्रमक
Pune News : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी, महात्मा फुले आणि शिर्डीचे साईबाबा यांच्याविषयी अपशब्द वापरले होते. यावरुन राज्यभरात गदारोळ सुरु आहे. या घटनेचे पडसाद विधानसभेत देखिल पाहायला मिळाले. आता पुण्यातून आणखी एक प्रकरण समोर आले आहे. एका प्राध्यापकाने हिंदू देवतांविषयी आक्षेपार्ह विधान केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
पुण्यातील नामांकित महाविद्यालयातील एका हिंदी विषयाच्या प्राध्यापकाने देवतांविषयी आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी आणि हिंदू संघटनाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. त्या प्राध्यापकाला अटक करण्यात यावी यासाठी विद्यार्थी आक्रमक झाले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाहांचे पुणे दौरे वाढले; उद्धव ठाकरेंनी सांगितला अर्थ…
आता पोलिसांनी त्या प्राध्यापकाला ताब्यात घेतले आहे. 8 दिवसांपूर्वी महाविद्यालयात क्लास सुरू असताना त्या प्राध्यापकाने हिंदू देव-देवतांच्या बाबतीत अपमान होईल, असं वक्तव्य केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या हालचालींना वेग, अध्यक्षपदासाठी 33 तर उपाध्यक्षपदासाठी 27 अर्ज
डेक्कन पोलिस स्टेशनमध्ये सध्या काही विद्यार्थी तसेच हिंदू संघटनेचे कार्यकर्ते जमले असून पोलिसांकडून गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळत आहे. अद्याप गुन्हा दाखल झाला नाही. मात्र, विद्यार्थी आणि हिंदुत्ववादी संघटनाचे कार्यकर्ते येथेच उपस्थित आहेत.