Pune News : ह्रदयद्रावक! आईने पोटच्या गोळ्याला रस्त्यावर टाकून काढला पळ…

Pune News : ह्रदयद्रावक! आईने पोटच्या गोळ्याला रस्त्यावर टाकून काढला पळ…

Pune News : पुण्यातून ह्रदय हेलावणारी घटना समोर आली आहे. आईने पोटच्या गोळ्याला लाकडाच्या बॉक्समध्ये घालून रस्त्याच्या बाजूला टाकून दिल्याची घटना घडलीय. हे अर्भक अहमदनगर-पुणे महामार्गाच्या बाजूला 100 मीटर आतमध्ये टाकून दिल्याचं आढळून आलं आहे. या घटनेने कोरेगाव-भीमा परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

विखेंच्या पाठपुराव्यानंतर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या जन्मगावातील शाळेस दोन कोटींचा निधी मंजूर

कोरेगाव भीमा परिसरातील नगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला मुलीचे अर्भक असल्याचं स्थानिक नागरिकांना दिसून आलं. त्यानंतर स्थानिक अजय गव्हाणे आणि किरण गव्हाणे यांनी या अर्भकाची माहिती शिक्रापूर पोलिसांना दिली.

चित्रपट सृष्टीच्या अडचणींची यादी घेऊन सुशांत शेलार पोहचला मुख्यमंत्र्याच्या भेटीला

माहिती समजताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले, पोलिसांनी माहेर संस्थेच्या संस्थापिका ल्युसी कुरियन यांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर महिला पोलिस कर्मचाऱ्यांसह रुग्णवाहिका येत अर्भकाला ताब्यात घेतलं. अर्भक ताब्यात घेतल्यानंतर मुलगी असल्याचं समोर आलं.

अहमदनगर : राष्ट्रवादी कार्यकर्त्याची मृत्यूशी झुंज अपयशी; भाजप नगरसेवकासह पाच जणांना अटक

त्यानंतर या सहा महिन्यांच्या मुलीवर शिक्रापूर इथल्या प्राथमिक उपचारासाठी पोलिसांच्या निगराणीत पाठवण्यात आलं. सकाळच्या सुमारास रस्त्यावर स्वत: च्या आईने या लहान मुलीला टाकून ती पळून गेली.

कृषी विभागात बंपर ओपनिंग्ज, पगार 1, 12400 रुपये, दहावी उत्तीर्ण उमेदवारही करू शकतात अर्ज

ही सहा महिन्यांची मुलगी थंडीत कुडकुडत आणि रडत होती. या मुलीला माशांचाही त्रास होत होता. त्यावेळी तिथून जाणारे किरण गव्हाणे यांना हे अर्भक दिसलं. त्यांनी पोलिस येईपर्यंत अर्भकाची देखभाल केली. त्यावेळी त्यांचे डोळे पाणावले होते.

दरम्यान, पोलिसांकडून या प्रकरणात गुन्हा दखल करण्याचे काम सुरू असून स्वत:च्या आईने पोटच्या गोळ्याला असं रस्त्यावर टाकून सोडून जाणं हे सर्वांच्या मनाला चटका लावणारी घटना असल्याची चर्चा परिसरांतील नागरिकांमधून ऐकायला मिळत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube