प्रांतधिकाऱ्यांना पुणे जिल्ह्याधिकाऱ्यांचे जैसे-तैसे उत्तर, आरोपांचे कारणही आले समोर

प्रांतधिकाऱ्यांना पुणे जिल्ह्याधिकाऱ्यांचे जैसे-तैसे उत्तर, आरोपांचे कारणही आले समोर

Pune Collector Suhas Diwase : खेड-राजगुरूनगर प्रांताधिकारी आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहणारे जोगेंद्र कट्यारे (Jogendra Katyare) यांच्या आरोपांवर आता पुणेचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे (Pune Collector Suhas Diwase) यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिला आहे.

पत्रकार परिषदेमध्ये सुहास दिवसे म्हणाले की, मी एकाचवेळी जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून दोन पातळ्यांवर काम करत आहे. जोगेंद्र कट्यारे यांनी माझ्यावर केलेला आरोप पत्र मी आज पाहिले असून त्यांनी आरोप पत्रात गल्लत केली आहे. शासनाला कट्यारे यांची बदली करण्याचा अधिकार आहे. मी पुणे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदावर येण्याआधी कट्यारे यांच्या विरोधात तक्रारी आल्या होत्या आणि त्यांची चौकशी करण्यात येत आहे. त्यांच्याकडून जमिन अधिग्रहणाची भरपाई देण्याची जबाबदारी काढून घेण्यात आल्याने ते व्यथित झाले असावेत असं जिल्हाधिकारी सुहास दिवसे म्हणाले.

जिल्हाधिकारी सुहास दिवसे पुढे म्हणाले, कट्यारे यांनी आरोप करून नियमभंग केलेला आहे. त्यांनी भरपाई देण्याच्या निकालात अनेक बदल केलेले आहेत. मात्र त्यांनी काही चुकीचे केलेले नसेल तर त्यांनी तपासणीला घाबरण्याचे कारण नाही. मी पुणे जिल्ह्यातील 21 आमदारांसोबत आणि चार खासदारांसोबत काम करतो यामुळे राजकीय संबंध असल्याच्या आरोपांना उत्तर देण्यात अर्थ नाही असं देखील दिवसे म्हणाले.

तर दुसरीकडे कट्यारे यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे हे राजकीय प्रभावातून काम करत असून लोकसभेची मतमोजणी होण्यापूर्वी त्यांची बदली करावी, अशी मागणी केली करत त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. सुहास दिवसे हे खेड-आळंदीचे अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते यांच्या प्रभावाखाली काम करत असल्याचा आरोप कट्यारे यांनी केला आहे.

…अन् भर मंचावर मंत्री विखेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली ‘ही’ मागणी

तसेच राजकीय हितसंबंधांचा आधार घेत सुहास दिवसे अनेक वर्षांपासून पुण्यात विविध पदांवर काम करत असल्याचा आरोप देखील त्यांनी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर केला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या

वेब स्टोरीज