पुण्याच्या ‘त्या’ भूमी अभिलेख उपअधीक्षकाचं निलंबन; पण शिक्षेचं काय? आपचा सवाल

पुण्याच्या ‘त्या’ भूमी अभिलेख उपअधीक्षकाचं निलंबन; पण शिक्षेचं काय? आपचा सवाल

Pune land records officer Suspended due to damaged to Property businessman for Bribe : सरकारी अधिकाऱ्यांकडून सर्व सामान्यांसह अनेकांना लाच मागितल्याचा प्रकार अनेकदा समोर येत असतो. मात्र पुण्यामध्ये भूमि अभिलेख अधिकाऱ्यांनी याचा कळस केला आहे. कारण त्यांनी लाचेची मागणी केली असता. ती मागणी पुर्ण न झाल्याने थेट संबंधित व्यवसायिकाच्या मालमत्तेचे नुकसान केल्याचा प्रकार घडला होता त्यानंतर आता या अधिकाऱ्याचं निलंबन करण्यात आलं आहे. मात्र त्यांना शिक्षा कधी होणार? हा प्रश्न आपचे नेते विजय कुंभार यांनी उपस्थित केला आहे.

काय म्हणाले विजय कुंभार?

हवेलीचा भूमी अभिलेख उपअधीक्षक अमरसिंह पाटील अखेर निलंबित. पण ही केवळ धूळफेक आहे! पाटील आणि भूमापन अधिकारी किरण येटाळे यांच्यावर हडपसर येथील जमिनीच्या मोजणी घोटाळ्यात गुन्हा दाखल आहे – आणि गुन्हा दाखल होताच हे दोघं फरार झाले आहेत. नागरिकांच्या वारंवार तक्रारी असूनही उपसंचालक, जमाबंदी आयुक्त आणि महसूलमंत्री गप्प का होते? हवेली मोजणी कार्यालय संपूर्णपणे भ्रष्ट आहे. अधिकाऱ्यांवर इतक्या उशिराने कारवाई आणि तीही केवळ एका प्रकरणापुरती आहे का? असा सवाल त्यांनी केला आहे. सरकारचा संदेश स्पष्ट आहे – जमीन लुटा, फरार व्हा, आणि फक्त निलंबनातच सुटका मिळवा! जनतेच्या मालमत्तेची लूट करणाऱ्यांवर सर्व प्रकरणांत फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत. निलंबन म्हणजे शिक्षा नाही – ती जनतेचा रोष शांत करण्यासाठी केलेली तजवीज आहे.

काय आहे हा नेमका प्रकार?

पुणे येथील हडपसरमध्ये फिर्यादी कुणाल चंद्रशेखर अष्टेकर यांनी सर्वे नं. 181/3, 181/4अ, 181/6 व 181/9/1 या जागेची 2023 व 2024 मध्ये भुमीअभिलेख कार्यालय, हवेली, पुणे यांचेकडुन शासकीय फी भरुन कायदेशीर रितसर पद्धतीने मोजणी करुन घेतली होती. परंतु या जागेच्या मोजणीनंतर हद्द निश्चिती करण्यासाठी जुन 2024 रोजी भुमी अभिलेख उपअधीक्षक अमरसिंह पाटील व भुकरमापक किरण येटाळे यांनी अष्टेकर यांच्याकडे 50 लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर किरण येटाळे याने सदर रकमेमध्ये सवलत देतो असे सांगुन 25 लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र आष्टेकर यांनी ही रक्कम देण्यास नकार दिला.

“मोदीजी, पाकिस्तानचे दोन तुकडे करा, POK भारतात विलीन करा”, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याची चर्चा

त्यावर आष्टेकर यांनी ही रक्कम दिली नाही. तर अमरसिंह पाटील, हे हेलीकॉप्टर शॉट लावतील असे बोलुन मालमत्तेचे नुकसान करण्याची धमकी भुकरमापक किरण येटाळे यांनी दिली. तसेच आष्टेकर यांच्यावर पैसे देण्यासाठी दबाव टाकला. तसेच ज्यावेळी आष्टेकर हे अमरसिंग पाटील यांनी मागितलेली रक्कम दिली नाही. तेव्हा ते शासकीय नोकर असुन देखील त्यांनी फिर्यादीचे नुकसान करण्यासाठी त्यांनी आष्टेकर यांच्या शेजारच्याची चुकीची ‘क’ प्रत तयार करुन मोठे नुकसान केले. मात्र या सर्व प्रकारानंतर फिर्यादी आष्टेकर यांनी पोलिसांमध्ये धाव घेतली आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संभाव्य ॲक्शनची चर्चा; पाकिस्तानमधील या दहशतवादी शाळा अ‍ॅक्टिव

याबाबत पुण्यातील येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप या अधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले नाही. या प्रकरणी सहा. पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा सुहास पाटील यांनी हा गुन्हा नोंदवून घेतला आहे. तर या प्रकरणाचा संपूर्ण तपास हा सहा पो आयुक्त आर्थिक व सायबर गुन्हे पुणे शहर मच्छींद्र खाडे हे करणार आहेत. त्यामुळे या व्यावसायिकाला न्याय कधी मिळणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube