देवधरांचा पुण्यात सव्वाशे वर्षांचा इतिहास; सुनील देवधरांनी टीकाकारांना सुनावले
Pune Loksabha : पुणे लोकसभा मतदारसंघातून (Ppune Loksabha) निवडणूक लढविण्यासाठी अनेक जण इच्छूक आहेत. भाजपचे नेते >सुनील देवधर यांचे (Sunil Deodhar) नाव आघाडीवर आहे. ते निवडणुकीचे तयारी करत आहेत. परंतु पुण्याशी देवधर यांचा संपर्क तुटलेला आहे, असे त्यांच्याबाबत बोलले जात आहे. परंतु हे सुनील देवधर यांनी मुद्देसुदपणे खोडून काढले आहे.
‘भाजपमध्ये घराणेशाही झाली तर टॅलेंट मग आमच्यावरच अन्याय का’; सुळेंचा शाहांना खडा सवाल
देवधर म्हणाले, काही लोक तर मी पुण्याचा नाही बाहेरच आहे असे म्हणत होते. माझा जन्म पुण्यातील नारायण पेठेतील आहे. शिक्षणही येथे झाले आहे. संघाचा प्रचारक असताना हेडक्वार्टर पुणे होते. पूर्वांचल विद्यार्थी वसतिगृह मी सुरू केले. असंख्य कार्य मी पुण्यात केले आहे. वडिल तरुण भारतचे संपादक होते. काकांनी जनसेवा बँक स्थापन आहे. देवधर कुटुंबाला सव्वाशे वर्षांचा पुण्याचा इतिहास आहे. काही जण बाळबोधपणे प्रश्न विचारत आहेत.
BSE बनला जगातील चौथ्या क्रमांकाचा शेअर बाजार, ‘या’ शेअर्सच्या जोरावर गाठला विक्रमी उच्चांक
माझी जन्मभूमी पुणे असून, तिला कर्मभूमी बनविण्याचे ठरविले आहे. पुणेकरांची सेवा करण्यासाठी पुण्येश्वराने मला बोलावले आहे. सांस्कृतिक व आंतरराष्ट्रीय खात्याचे हे शहर आहे. शस्त्री निर्मिती, आयटी, खेळात या शहाने योगदान दिले आहे. या शहराची शक्ती आणखी वाढविण्यासाठी प्रयत्न करायचे असल्याचा विश्वास देवधर यांनी व्यक्त केला आहे.
पुण्याच्या कोंडी फोडायचीय
मला वाटते पुण्याचा खासदार कसा असावा असे पक्ष विचार करतो. पुण्याचे अनेक प्रश्न पेंडिग आहेत. बापट आजारी होते. त्यांचे निधन झाल्याने वर्षभर अनेक प्रश्न प्रश्न प्रलंबित होते. या प्रश्नांची कोंडी मला फोडायची असल्याचे देवधर यांनी सांगितले.