पुणं पुन्हा हादरलं! सहकारनगरमधून 32 वर्षीय महिलेचे अपहरण; कर्जतच्या जंगलात अत्याचार
पुणे : शहरातील सहकारनगरमधील एका 32 वर्षीय महिलेचे अपहरण (Kidnap) करून तिच्यावर कर्जतच्या जंगलात अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्याच आठवड्यात बोपदेव घाटात 21 वर्षीय तरूणीवर सामूहिक अत्याचाराची घटना ताजी असतानाच महिलेचे अपहरण करून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली असून, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. (32 Years Women Kidnap From Pune Sahakar Nagar Area)
Video : करोडो गरिबांची दसरा-दिवाळी गोड! डिसेंबर 2028 पर्यंत मोफत तांदूळ देण्याचा मोदींचा निर्णय
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, 32 वर्षीय महिला ही पुण्यातील सहकार नगर परिसरात वास्तव्यास असल्याचे सांगितले जात आहे. या महिलेला तिच्या ओळखीच्या व्यक्तीने गाडीत बसवत कर्जतला नेले. येथे पोहचल्यावर 36 वर्षीय आरोपीने तेथील जंगलात तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. आरोपी एवढ्यावर न थांबता त्याने पीडितेला दोन दिवस डांबून ठेवत तिला मारहाण केल्याचेही समोर येत आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, महिलावर्गात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
सरकारी योजनांच्या डिजिटल प्रचारासाठी ९० कोटींचं टेंडर; जाहिरातबाजी रडारवर..
बोपदेव घाटातील आरोपी अद्यापही मोकाट
बोपदेव घाटामध्ये 21 वर्षीय तरुणी मित्रासोबत फिरण्यासाठी गेली होती. त्यावेळी तेथे तिघेजण आले आणि आपण मानवाधिकार संघटनेचे कार्यकर्ते असल्याचे सांगून त्या तरुणीचे आणि मित्राचे फोटो काढले. त्यानंतर या तिघांनी तरुणीला कारमध्ये बसवत तिला येवलेवाडीजवळ घेऊन गेले. या ठिकाणी तिघांनी तरूणीवर अत्याचार केले आणि नंतर तिला खडी मशीन चौकात सोडून पसार झाले. या घटनेनंतर एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, यात तिघेजण मध्यरात्रीच्या सुमारास रस्त्यावर उभे असल्याचे दिसून येत आहे. मात्र, अद्यापही या घटनेतील आरोपी मोकाट असून, पोलिसांनी आरोपींची माहिती देणाऱ्यास 10 लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे.
Video : फेस्टिव सिजनमध्ये शॉपिंग करणाऱ्यांची बल्ले-बल्ले; RBI ने घेतले तीन मोठे निर्णय
अत्याचारांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ
पुण्यातील वानवडी भागात असलेल्या एका स्कूल व्हॅन चालकाने दोन चिमुरडींवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकर समोर आला होता. तर, दुसरीकडे पुण्यातील वारजे परिसरात राहणाऱ्या एका नराधम बापाने आपल्या पोटच्या मुलीवरच तब्बल एक वर्ष लैंगीक अत्याचार केल्याची घटना समोर आली. शाळेतील ‘गुड टच बॅट टच’ उपक्रमातून उघडकीस आला गंभीरप्रकार समोर आला असून नराधम बापाला पुणे पोलिसांनी (Pune Police) अटक करण्यात आली आहे. शहरातील महिला आणि मुलींवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांमुळे महिलावर्गात भीतीचे वातावरण असून, पोलिसांचा वचक राहिला आहे का? असा संतप्त प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.