हिंदू विकाऊ वाटले काय? अजितदादा ‘त्या’ पदाधिकाऱ्याला हाकला…धंगेकर आक्रमक

Ravindra Dhangekar : हिंदू म्हणजे काय विकाऊ वाटले का? कोणी यावे पैसे द्यावे आणि त्यांचे धर्मांतर करून त्यांच्यावर अत्याचार करावे यापुढे अशा गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत, असा आक्रमक पवित्रा शिवसेना (शिंदे) नेते माजी आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी घेतला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी असलेला शंतनू कुकडे याच्यावर पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. तो मजबूर कुटुंबांच्या गरिबीचा फायदा घेत त्यांच धर्मांतर आणि महिला, मुलींचे लैंगिक शोषण करतो त्याच्यावर पोलिसांनी कडक कारवाई करावी तसेच राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्याची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी धंगेकरांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केली आहे.
धंगेकर आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणाले, “शंतनू कुकडे नावाच्या एका नराधमावर पुणे शहरातील समर्थ पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरंतर या व्यक्तीबद्दल यापूर्वी माझ्याकडे काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या परंतु गेल्या काही दिवसांपासून आम्ही सबळ पुराव्यांची जुळवाजुळव करत होतो.
वक्फ बोर्ड बिल ते लाडकी बहिण योजना; काँग्रेसकडून सरकारच्या कार्यपद्धतीवर ताशेरे
हे प्रकरण केवळ बलात्कारापुरते मर्यादित नसून ही व्यक्ती धर्मांतराचे मोठे रॅकेट पुणे शहरात राबवते. गोरगरीब हिंदू कुटुंबांना टार्गेट करून त्यांचे बळजबरीने धर्मांतर घडवून आणले जाते. काही गरजू कुटुंबातील महिला व मुलींच्या मजबुरीचा फायदा घेत त्यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे प्रकार या नराधमाकडून केले जातात तसेच काही हाय प्रोफाईल व्यक्तींना मुली पुरवण्यापर्यंतचा उद्योग नराधम करतो. समर्थ पोलीस स्टेशन कडे याबाबत यापूर्वी तक्रारी दाखल होऊन देखील त्यांनी या प्रकरणात हलगर्जीपणा केला आहे.या शंतनु कूकडे कडुन मिळणाऱ्या मलईमुळे संबंधित पोलीस स्टेशनचे अधिकारी आजवर त्याला सांभाळून घेतात, या प्रकरणात देखील मुसा, मुनीर, प्रतीक, सागर, जैन व पूनम आदी नामक व्यक्तींचा सहभाग असून हा तपास अतिशय थंड गतीने व चुकीच्या दिशेने सुरू आहे.
पुढे ते म्हणाले, माझी पोलीस प्रशासनास विनंती आहे की आपण या सगळ्या प्रकरणाची सीआयडी चौकशी करावी. कुठल्याही परिस्थितीमध्ये हिंदू कुटुंबीयांची अश्या प्रकारची फसवणूक करत धर्मांतराचा प्रयत्न जर कोणी करत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही. या नराधमाच्या बँक खात्यांची चौकशी केली असता देशाबाहेरील ट्रस्ट कडून कोट्यावधी रुपये धर्मांतरासाठी देणगी मिळाल्याचे देखील माहिती मिळाली आहे.
मित्राच्या मदतीने उपजिल्हाधिकारी पतीला संपवण्याचा डाव; मनोज जरांगेंचा सहकारी मुख्य आरोपी
हिंदू म्हणजे काय विकाऊ वाटले का….? कोणी यावं पैसे द्यावे आणि त्यांचे धर्मांतर करून त्यांच्यावर अत्याचार करावे…? पुणे शहरात या पुढील काळात या सगळ्या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत. माझी सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांना देखील विनंती आहे अशा प्रकारच्या नराधम व्यक्तीची पक्षातून तातडीने हकालपट्टी करावी.” अशी मागणी धंगेकरांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये केली आहे.
दरम्यान, याच प्रकरणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी अन कार्यकर्त्यांनी देखील या संदर्भात आंदोलन केल आहे. तर धंगेकरांनी यापुढे दोन पावलं टाकत हिंदूंवर यापुढे अत्याचार होऊ दिला जाणार नाही असा सूर आवळत त्यांच्यातील जुना शिवसैनिक नव्याने जागा झाला आहे. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसची साथ सोडत धंगेकर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आले आहेत त्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतल्याचे बघायला मिळत आहे.