पुणे पोलीस अडचणीत, निरीक्षकासह 17 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल; धक्कादायक प्रकरणामुळे खळबळ

Pune Police brutally beat minors पुणे पोलीस दलाला हादरवून सोडणारी आणि कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी घटना समोर आली आहे.

Pune Police Brutally Beat Minors

Pune Police brutally beat minors, 17 officers, employees charged serious crimes including atrocity : पुणे पोलीस दलाला हादरवून सोडणारी आणि कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. आंबेगाव पठार पोलीस चौकीत तब्बल 8 अल्पवयीन मुलांना कथितरित्या बेकायदेशीरपणे डांबून ठेवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या मुलांना बेल्टने बांधून मारहाण केल्याचा तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी 17 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांचा ताफा शेतकऱ्यांनी अडवला; फडणवीस गाडीतून उतरले, शेतकऱ्यांना आश्वासन दिलं

महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या (NHRC) आदेशानंतर या प्रकरणात कारवाई करण्यात आली. सीआयडीच्या फॅक्ट-फाइंडिंग अहवालाच्या आधारे संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे.

आंबेगाव पठार चौकीत दोन दिवस नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, 20 आणि 21 जुलै 2026 रोजी आंबेगाव पठार पोलीस चौकीत कायद्याच्या संघर्षात असलेल्या (CCL – Child in Conflict with Law) आठ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले होते. मात्र, या मुलांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांकडून नियमांचे उल्लंघन झाल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

खाद्य तेलाच्या किंमती कमी होणार? केंद्र सरकारकडून कच्च्या व शुद्ध तेलांवरील बेसिक कस्टम्स ड्युटीत कपात

आरोपानुसार, मुलांना आवश्यक कायदेशीर प्रक्रिया न पाळता पोलीस चौकीत डांबून ठेवण्यात आले. यावेळी त्यांना बेल्टने मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच बालसंगोपन पोलीस अधिकाऱ्याची उपस्थिती नसतानाही कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केल्याचे दाखवण्यासाठी अहवाल तयार करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

‘ज्ञानेश कुमार गृहमंत्र्यांचा छोटा शकिल, राजीनामा द्यावाच लागेल’; संजय राऊतांचे गंभीर आरोप

या मुलांना नियमानुसार बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आले नाही, उलट त्यांना बेकायदेशीररीत्या पोलीस ताब्यात ठेवण्यात आल्याचा आरोप आहे. यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील काही मुलांना जातीवाचक टिप्पणी आणि अपमानास्पद वर्तनाला सामोरे जावे लागल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांना सार्वजनिक ठिकाणी अपमानित करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद असल्याची माहिती आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह 11 जणांविरोधात FIR

गुन्हे अन्वेषण विभागातील तक्रारदार संकेत सतीश गोसावी यांच्या फिर्यादीवरून भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात FIR क्रमांक 0483/2026 नोंदवण्यात आला आहे.

या प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये—

मानसिंग पाटील – वरिष्ठ पोलीस निरीक्षक
गणेश मोहिते – सहाय्यक पोलीस निरीक्षक (API)
स्नेहल थोरात – सहाय्यक पोलीस निरीक्षक (API)
निलेश मोकाशी – पोलीस निरीक्षक (PI)
सुनील हनवटे – पोलीस हवालदार
दिनेश टापके – पोलीस हवालदार
मितेश चोरमोले – पोलीस अंमलदार
सागर बोरसे – पोलीस अंमलदार
सोहम रोडेकर – पोलीस अंमलदार
मंगेश पवार – पोलीस अंमलदार
स्वप्ना भिसे – महिला पोलीस अंमलदार

याशिवाय, या प्रकरणाशी संबंधित एकूण 17 पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात गंभीर आरोपांनुसार चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

विविध कठोर कायद्यांनुसार कारवाई

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधितांवर भारतीय न्याय संहिता (BNS), 2023, बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा, 2015 आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, 1989 यांसारख्या कायद्यांतील तरतुदींनुसार कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. बाल न्याय कायद्यातील कलम 74 आणि 75 अंतर्गत बालकाची ओळख उघड करणे आणि बालकावर क्रूर किंवा अमानुष वर्तन यासंदर्भातील तरतुदींचाही उल्लेख करण्यात आला आहे.या संपूर्ण प्रकरणाचा तपास अप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण विभाग (CID) करत आहे.

 

follow us