पुणे : हेमंत रासने यांच्यावर पोलिसात गुन्हा दाखल

पुणे : हेमंत रासने यांच्यावर पोलिसात गुन्हा दाखल

पुणे : कसबा (Kasba)पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडलं. पोटनिवडणुकीचं (By Election) मतदान करताना हेमंत रासने (Hemant Rasne)यांच्या गळ्यात भाजपचं (BJP)चिन्ह असलेले मफलर परिधान करुन गेले होते. रासने यांनी मफलर गळ्यात असताना मतदान (Voting)केलं. मात्र, हे करत असताना निवडणूक आयोगाच्या कोणत्याही अधिकाऱ्यानं हस्तक्षेप केला नाही. याच मुद्यावर राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Thombare Patil)यांनी आक्षेप घेत हेमंत रासनेंवर हल्लाबोल केलाय. रुपाली पाटील ठोंबरे यांनी आता निवडणूक आयोगाकडं हेमंत रासनेंवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर विश्रामबाग पोलीस ठाण्यात भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्याविरुद्ध निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी (Election Commission Officer)तक्रार दाखल केल्याची माहिती मिळतेय.

रविवारी (दि.26)सकाळी कसबा पोटनिवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली. भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनी नुमवि शाळेत जाऊ मतदान केलं. मात्र, हेमंत रासने यांनी मतदान करताना गळ्यात भाजपचं चिन्ह असलेलं मफलर परिधान केलं होतं. त्याच मफलवर बोट ठेवत रुपाली पाटील यांनी रासनेंना सवाल केलाय. त्यासोबत निवडणूक आयोगाला देखील कारवाईची मागणी केलीय.

शिंदे महाराष्ट्राचे की गुजरातचे मुख्यमंत्री? आदित्य ठाकरेंनी भर सभेत ललकारलं

रासने यांनी जाणीव पूर्वक मतदान केंद्रात गळ्यामध्ये भाजपचा मफलर घालून मतदान केलं. हा आचारसंहिताचा भंग आहे. त्यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल झाला पाहिजे. काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांनीही सकाळी मतदान केलं. त्यांच्या गळ्यात कोणताही मफलर नव्हता म्हणून रवींद्र धंगेकर यांनी आचारसंहितेचं पालन केल आहे. तर, हेमंत रासने यांनी आचारसंहितेचा भंग केल्यानं त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी रुपाली पाटील ठोंबरे यांनी केलीय.

रुपाली पाटील-ठोंबरे यांच्या आरोपांना रासने यांनी उत्तर दिलंय. सावरकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी गेलो होतो. मतदानाला लवकर पोहोचण्याच्या घाईत अनावधानानं गळ्यामध्ये भाजपचे चिन्ह असलेली मफलर राहिली. मतदान केंद्रावरही शासकीय अधिकाऱ्यांनी मला गळ्यातील मफलर काढण्याची सूचना केली नाही. माझ्या मनात काहीही नव्हतं. पण लक्षात आल्यानंतर काढून टाकली, असं रासने यांनी सांगितलं होतं. मात्र आता त्यांच्या या कृत्याबद्दल आणि रुपाली पाटील-ठोंबरे यांच्या मागणीला यश मिळालंय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube