पुणे पोलिसांची मोठी कारवाई! आखाती देशातील नागरिकांना लुटणारी टोळी जेरबंद
Pune Crime : पुण्यात वैद्यकीय उपचारासाठी आलेल्या आखाती देशामधील नागरिकांना लुटणाऱ्या टोळीला पुणे पोलिसांनी (Pune Police)अटक केली आहे. ही दिल्लीतील इराणी टोळी (Iranian tribe)असल्याची माहिती समोर आली आहे. या टोळीकडून तब्बल तीन हजार डॉलर, 500 सौदी रियालसह भारतीय 53 हजार रुपये आणि मोटार असा मुद्देमाल जप्त केला आहे.
‘भाजपकडून देशाचा अन् राज्याचा लिलाव’; अर्थसंकल्पावरुन नाना पटोलेंची जहरी टीका
या पार्श्वभूमीवर कोंढवा पोलिसांनी सिंकदर अली खान, वय 44 वर्षे, रा.बी-39, राजदूत हॉटेल जवळ तंगपुरा दक्षिण दिल्ली, करिम फिरोज खान, वय 29 वर्षे, रा.18 तिसरा मजला आय ब्लॉक कस्तुरबा नगर लाजपतनगर साऊथ दिल्ली, इरफान हुसेन हाशमी, वय 44 वर्षे, रा. बी-39 राजदूत हॉटेलजवळ, जंगपुरा दक्षिण दिल्ली आणि मेहबुब अब्दुल हमदी खान, वय 59 वर्षे, रा.बी-39 राजदुत हॉटेल जवळ, जंगपुरा दक्षिण दिल्ली यांना अटक केली आहे.
नाशिकमध्ये हेमंंत गोडसे सेफ : CM शिंदेंचा निरोप न आल्याने शांतिगिरी महाराजांनी निवडली वेगळी वाट
याबद्दल पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कोंढवा भागात राहणारे परदेशी नागरिक सालेह ओथमान अहमद, वय-52 वर्षे, मूळ रा. यमन हे त्यांच्या पत्नीच्या उपचारासाठी पुण्यात आले होते. ते 8 फेब्रुवारीला सायंकाळी आशिर्वाद चौकात त्यांच्या पत्नीसह पायी जात असताना चारचाकी गाडी जवळ येऊन उभी करुन आरोपी हे त्याच्याशी अरबी भाषेत बोलून आपण पोलीस असल्याचे भासवले.
तुमच्याकडील वस्तूंची आणि ओळखपत्राची पडताळणी करायची आहे, असे सांगून जवळ बोलावले. त्यानंतर त्याने त्यांचे ओळखपत्र दाखवल्यासारखे केले. त्यावेळी परदेशी नागरिक घाबरुन गाडीतील व्यक्ती पोलीस असल्याचा विश्वास बसल्याने, त्यांनी खिशातील, कागदपत्रे त्याला दाखवत असतानाच, सोबत खिशातील पैसे देखील त्याला दिले. त्यावेळी गाडीतील व्यक्तींनी कागदपत्रांचा व पैशाचा वास घेवून, तपासत असल्याचे भासवले. काही समजायच्या आत परदेशी नागरिकाकडून सौदी 500 रियाल, तीन हजार अमेरीकन डॉलर, 53 हजार रुपये भारतीय रोख रक्कम, असा मुद्देमाल चोरी करुन पळून गेले. यानंतर फिर्यादी सालेह ओथमान अहमद यांनी लगेच कोंढवा पोलीस ठाण्यात धाव घेतली.
पोलीस असल्याचे भासवून यमन देशातील नागरिकांच्या अज्ञानाचा फायदा घेत या आरोपींनी चोरी केली. याबाबत पुणे पोलिसांनी तात्काळ दखल घेत अज्ञात आरोपीचा शोध सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून सुरु केला. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून खालापूर टोल नाका ते नवी मुंबई ते तुर्भे-ठाणे-पालघर-खणीवडे टोल नाका-चारोटी टोल नाका-डहाणू घोलवड-गुजरात राज्याच्या हद्दीतून केंद्रशासित प्रदेश दमणपर्यंत आरोपींनी वापरलेल्या वाहनाचा शोध घेऊन चार आरोपी निष्पन्न करण्यात आले.
पुण्यामध्ये आणखी गुन्हा करण्यासाठी येताना त्यांना ताब्यात घेऊन त्यांचेकडील गुन्ह्यात वापरलेले वाहन देखील जप्त करण्यात आले. ही घटना घडल्यापासून सुमारे 10 तास 30 मिनिटांचा कालावधीत सुमारे 600 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासून व पुणे ते दमण तसेच परत पुणे असे एकूण 750 किलोमिटरचे अंतर पाठलाग करुन आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांनी दिली.