मोठी कारवाई! पुण्यात तीन कोटीहून अधिकची रोकड जप्त

Untitled Design   2023 05 09T092133.962

Pune Police Seized crores of rupees : पुण्यातील हडपसर परिसरातून तब्बल 3 कोटी 42 लाख रुपयांची रोख रक्कम पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट पाच पथकाने जप्त केली आहे. विशेष म्हणजे या नोटांबरोबर पैसे मोजण्याचे मशीनसुद्धा सापडले आहे. सोमवारी (ता. 8 मे) रात्री दहाच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे.प्रशांत धनपाल गांधी या व्यक्तीला याबाबत ताब्यात घेण्यात आले आहे. गुन्हे शाखा, वाहतूक शाखा आणि लोणी काळभोर पोलीस स्टेशन यांनी संयुक्तरित्या कारवाई केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अधिक माहिती अशी की, पुणे सोलापूर महामार्गावरून एक चार चाकी जात असताना संशय आल्याने गुन्हे शाखेच्या पथकाने थांबवली. त्यानंतर या वाहनाची झडती घेण्यात आली. यामध्ये चार चाकीमध्ये काही बॅगेत तब्बल 3 कोटी 42 लाख 66 हजार रुपये मिळून आले. त्यानंतर पोलिसांनी ही रोख रक्कम आणि चारचाकी हडपसर पोलीस स्टेशन येथे आणत याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात नोंद केली आहे. विशेष म्हणजे या नोटांबरोबर पैसे मोजण्याचे मशीनसुद्धा सापडले आहे.

Manipur violence : राज्य सरकारच्या प्रयत्नांना यश, मणिपूरमध्ये अडकलेले 25 विद्यार्थी सुखरूप परतले

दरम्यान, कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सह आसपासच्या राज्यातील पोलीस सतर्क आहेत. मात्र, याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या प्रशांत गांधीकडे अधिक चौकशी केली असता त्याने ही रक्कम राहत्या घरातून लक्ष्मी रोड येथील महाराष्ट्र बँकेत भरण्यासाठी घेऊन जात असल्याचे सांगितले. ही रोख रक्कम आपल्याला कर्जापोटी भरायची आहे, असे त्याने सांगितले आहे पोलीस पुढील तपास करत आहेत.

Tags

follow us