अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण युद्धाचा फटका, पुण्याचे विद्यार्थी-शिक्षक दुबईत अडकले
पुण्यातील नामांकित इंदिरा कॉलेजचे ८४ जण दुबई मध्ये अडकले आहेत. त्यामध्ये ८० विद्यार्थी आणि ४ शिक्षकांचा समावेश आहे.
अमेरिका आणि इस्रायलचे इराणसोबत सुरू असलेल्या युद्धाचा भारतीयांना मोठा फटका बसला आहे. इराणने दुबईवर क्षेपणास्त्र हल्ला केल्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. हवाई क्षेत्र बंद असल्याने विमानाचे उड्डाण बंद करण्यात आले आहेत. याचा परिणाम पुण्यातील पिंपरी-चिंचवडमधील इंदिरा कॉलेजचे ८४ भारतीय दुबईत अडकून पडले आहेत
सर्व विद्यार्थी सुखरूप
पुण्यातील नामांकित इंदिरा कॉलेजचे ८४ जण दुबई मध्ये अडकले आहेत. त्यामध्ये ८० विद्यार्थी आणि ४ शिक्षकांचा समावेश आहे. हे सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आलेली आहे. दुबईत अडकलेले हे सर्व विद्यार्थी सुखरूप असून आम्ही त्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या सतत संपर्कात आहोत. विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे मायदेशी परत आणण्यासाठी दुबईतील भारतीय दूतावास आणि आपल्या देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाशी आमचे बोलणे सुरू आहे, अशी माहिती इंदिरा कॉलेजचे डीन जनार्दन पवार यांनी दिली आहे.
LIVE : अमेरिका इस्त्रायलच्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते ठार, पाहा युद्धात काय घडतय?
पुण्यातील नामांकित इंदिरा कॉलेजचे विद्यार्थी “स्टडी व्हिसिट” साठी दुबई येथे गेले होते. पण त्याचवेळी युद्धजन्य परिस्थिती सुरू झाली. परराष्ट्र मंत्रालयाकडून पुण्यातील विद्यार्थ्यांना लवकरात लवकर भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. कृपया कोणी ही घाबरून जाऊ नये, विद्यार्थ्यांना लवकरात लवकर मायदेशात आणले जाणार, महाविद्यालयाकडून आवाहन करण्यात आल आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून सुद्धा विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
चार विमाने रद्द
इराण-इस्त्राइल अमेरिका युद्धामुळे पुण्यातून दुबईला जाणारी चार विमाने रद्द करण्यात आली आहेत. पुण्यातून स्पाइस जेट कंपनीचे मुंबई ते दुबई तसेच एअर इंडिया एक्सप्रेसचे पुणे ते दुबई विमान रद्द करण्यात आले आहे. विमानतळावर प्रवाशांच्या सोयीसाठी अतिरिक्त कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. विमानतळावर येण्याआधी प्रवाशांनी संबंधित एअरलाइनशी संपर्क साधून फ्लाईट स्टेटस तपासण्याची विमानतळ प्रशासनाकडून विनंती करण्यात आले. युद्धजन्य परिस्थिती संपल्यानंतर पुढील तारखेचे पर्यायी उड्डाण प्रवाशांना दिले जातील असे सांगण्यात आलेय.
