मोठी बातमी! पुणे-मुंबई धावणाऱ्या रेल्वे 6 दिवसांसाठी रद्द…
Pune News : रेल्वे प्रवाशांसाठी एक मोठी बातमी समोर आलीयं. पुणे-मुंबई (Pune-Mumbai) धावणाऱ्या दोन रेल्वे 28 मे ते 2 जूनपर्यंत अशा 6 दिवसांसाठी रद्द करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. यामध्ये पुणे ते मुंबई धावणारी डेक्कन क्वीन (Deccan Queen) आणि प्रगती एक्सप्रेस (Pragati Express) रेल्वे रद्द करण्यात आलीयं. तांत्रिक अडचणीमुळे काम सुरु असल्याने रेल्वे प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आलायं. सीएसएमटीवर सध्या काम सुरु आहे, त्यामुळे रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत.
जंगली रमीबद्दल सचिन तेंडुलकर दखल घेणार नसतील तर तीव्र आंदोलन करणार -बच्चू कडू
मुंबईच्या सीएसटी टर्मिनल प्लॉट 10 आणि 11 च्या विस्तारीकरणाचं काम सध्या सुरु आहे. त्यामुळे पुणे ते मुंबई दरम्यान धावणारी डेक्कन क्वीन दोन दिवस तर प्रगती एक्सप्रेस सहा दिवस रद्द करण्यातचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. काही गाड्या सीएसएमटी स्थानकाऐवजी दादरपर्यंत धावणार आहेत. त्यामुळे पुणे मुंबई प्रवास करणाऱ्यांची काही दिवस गैरसोय होणार आहे.
इराणचे राष्ट्राध्यक्ष म्हणून वादग्रस्त कार्यकाळ! वाचा, कोण होते कट्टर धर्मगुरू इब्राहिम रईसी
पुणे मुंबई पुणे प्रगती एक्सप्रेस 28 मे ते 2 जून दरम्यान बंद असणार आहे. तर पुणे मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस 31 ते 2 जून दरम्यान बंद असणार आहे. पुणे मुंबई पुणे डेक्कन एक्सप्रेस 1 आणि 2 जूनला रद्द करण्यात आलेली आहे. तर पुणे मुंबई पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेस 1 आणि 2 जूनला बंद असणार आहे, तर कुर्ला मडगाव कुर्ला या गाड्या 1 आणि 2 जूनला रद्द करण्यात आलीयं.
उद्धव ठाकरे कुटुंबाचं पहिल्यांदाच काँग्रेसला मत?, म्हणाले जुमलेबाजीला लोक कंटाळले
दरम्यान, सध्या उन्हाळ्याच्या सुट्टी सुरु असल्याने रेल्वेने प्रवास करणारे प्रवासी अधिक आहेत. अशातच अचानकपणे रेल्वे प्रशासनाने गाड्या रद्द केल्याने प्रवाशांची गैरसोय होणार आहे. दरम्यान, रेल्वे प्रवाशांनी याची नोंद घेवून प्रवासाचं नियोजन करण्याचं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलंय.