पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; केंद्राकडून आणखी एका वंदे भारतचे गिफ्ट

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; केंद्राकडून आणखी एका वंदे भारतचे गिफ्ट

Pune Vande Bharat Express :  महाराष्ट्रामध्ये सध्या दोन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरु आहेत. मुंबई ते शिर्डी व मुंबई ते सोलापूर या दोन मार्गावर ही रेल्वे धावत आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई ते गोवा या मार्गावरदेखील वंदे भारत एक्सप्रेस सुरु होणार होती. पण ओडिशा येथील रेल्वे अपघातामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. सध्या पुणेकरांसाठी मुंबई ते सोलापूर ही ट्रेन सुरु आहे. या रेल्वेला पुणे रेल्वे स्टेशनवर थांबा आहे.

पण आता पुणेकरांसाठी आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस सुरु होणार आहे. तिरुपती ते हैदराबाद अशी वंदे भारत एक्सप्रेस सुरु होती. यापूर्वी सिकंदराबाद ते विशाखापट्टनम या मार्गावर ही एक्सप्रेस चालवली जात होती. आता पुणे ते सिकंदराबाद या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन धावणार आहे. ( Pune To Sikandarabad Vande Bharat Express )  सध्या पुणे ते सिकंदराबाद या मार्गावर शताब्दी एक्सप्रेस सुरु आहे. ही ट्रेन पुणे ते हैदराबाद हा प्रवास 8.25 तासांमध्ये पूर्ण करते.

Disha Patani Birthday: अवघे ५०० रुपये घेऊन मुंबईत आली अन् कोट्यवधींची मालकीण झाली!

तसेच याव्यतिरिक्त सिकंदराबादहून नागपूरसाठी वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्यात येणार आहे. या गाडीला काजीपेट, रामागुंडम, मनचेरियल, सिरपूर कागजनगर आणि बलारशाह या ठिकाणी थांबा दिला जाऊ शकतो. बेंगळूरु, पुणे, नागपूर मार्गावर वंदे भारत सुरु करण्याच्या योजनेमुळे सिकंदराबाद- नागपूर गाडी सुरु होणार आहे.

Disha Patani Birthday: अवघे ५०० रुपये घेऊन मुंबईत आली अन् कोट्यवधींची मालकीण झाली!

वंदे भारत एक्सप्रेसमधील सुविधा

  • या ट्रेनमध्ये प्रत्येक सीटसाठी स्वतंत्र मोबाईल चार्जिंगची सुविधा
    जेवण किंवा नाश्ता करण्यासाठी फोल्डेबल कॉम्पॅक्ट टेबल
    लोणावळा घाटासह विविध दृश्य पाहण्यासाठी रोटेट चेअरही आहे
    मोबाईल किंवा कॅमेरात विहंगम दृश्य टिपण्याचा आनंद
    अगदी विमानात प्रवास करावा अशा पद्धतीच्या अद्ययावत सुविधा
    मुंबईहून सोलापूरला ही ट्रेन केवळ साडेसहा तासात पोहोचते
    या ट्रेनमध्ये चेअर कार आणि एक्झिक्यूटिव्ह कार अशा दोन प्रकारच्या बोगी

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube