Shrimant Dagdusheth Halwai Ganapati : पहिल्यांदाच रात्री 9 वाजता विसर्जन; अवघ्या 5 तासात संपली मिरवणूक

Shrimant Dagdusheth Halwai Ganapati : पहिल्यांदाच रात्री 9 वाजता विसर्जन; अवघ्या 5 तासात संपली मिरवणूक

पुणे : यंदा पहिल्यांदाच पुण्यातील सुप्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे 8 वाजून 53 मिनिटांनी विसर्जन झाले आहे. दरवर्षी हे विसर्जन दुसऱ्या दिवशी सकाळी होत असते. मात्र यंदा दुपारी चार वाजताच विसर्जन मिरवणुकीत लागल्याने पहिल्यांदाच दगडूशेठ गणपती रात्री 8 वाजता अलका टॉकीज चौकात आला होता. तिथून अवघ्या तासाभरात गणपती बाप्पाचे विसर्जनही झाले. (first time this year, Pune’s well-known Shrimant Dagdusheth Halwai Ganapati was immersed at 8:53 PM)

पुण्यातील अन्य मंडळांचे देखावे पाहण्यासाठी ज्याप्रमाणे लाखोंची गर्दी होते. त्याचप्रमाणे दरवर्षी श्रीमंत दगडूशेठ गणपतीचा देखावा आणि त्याची विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी लाखो भाविक गर्दी करतात. दरवर्षी दगडूशेठ गणपतीचे विसर्जन साधारण अनंत चतुर्थदशीच्या दुसऱ्या दिवशी पांचाळेश्वर घाटावर केले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून दगडूशेठ गणपती रात्रीच्या सुमारास विसर्जन मिरणुकीच्या रांगेत लागत असे. त्यानंतर लाखो भाविक दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेत विद्युत रोषणाई केलेल्या रथाचे छायाचित्र डोळ्यात वर्षभरासाठी साठवून घेतात.

Sanjay Kakade : फडणवीसांच्या सागर बंगल्यावर काकडेंचे गणपतीला साकडे!

दगडूशेठ गणपतीवर असलेली पुणेकर आणि पुण्याच्या बाहेरील भक्तांची असलेली भक्ती यामुळे मध्यरात्री निघूनही मंडळाला अलका चौकात येण्यासाठी काही तासांचा अवधी लागतो. गेल्या अनेक वर्षांपासून तांबडं फुटायला आणि दगडूशेठ अलका चौकात येण्याचा क्रम आहे. त्यासाठी अनेक भाविक काही मंडळांच्या मिरवणुका पाहून झाल्या की झोपं काढून ठरलेल्या वेळेत अलका चौकात उपस्थित राहतात. मात्र, यंदा हे चित्र दिसलेलं नाही. यंदा पहिल्यांदाच रात्री 8.53 मिनिटांनी दगडूशेठ हलवाई गणपतीचे विसर्जन झाले आहे.

Video: फटाके फुटले ! पुण्यात गणेश मंडळाच्या देखाव्याला लागली आग, नड्डांनी आरती सोडली

का करण्यात आला वेळेत बदल?

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती हा यंदाच्या गणेशोत्सवात विसर्जन मिरवणुकीच्या पहिल्याच दिवशी दुपारी 4 वाजता मिरवणुकीत सहभागी होणार असल्याचे दगडूशेठ हलवाई गणपती सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी गणेशोत्सवापूर्वीच्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले होते. चव्हाण म्हणाले, मागील अनेक वर्षे दगडूशेठ गणपतीची विसर्जन मिरवणूक परंपरेप्रमाणे मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी पहाटे निघत असे. यामुळे अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीचे विसर्जन होत नाही. यासाठी यंदापासून हा बदल करण्यात आला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube