परीक्षेच्या तारखेवरून MPSC मध्ये काय चाललंय? रोहित पवारांनी चॅटचा स्क्रीनशॉट दाखवत उपस्थित केला सवाल

MPSC परीक्षेतील कथित गैरप्रकारांवरून रोहित पवारांनी पुन्हा सरकारला घेरत WhatsApp चॅटचा स्क्रीनशॉट शेअर करून प्रश्न उपस्थित केलेत.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 09 26T154740.893

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमधील कथित गैरप्रकारांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आमदार रोहित पवार यांनी MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी करत 27 सप्टेंबरच्या आंदोलनाची घोषणा केली आहे. त्यातच आता त्यांनी सोशल मीडियावर WhatsApp चॅटचा कथित स्क्रीनशॉट शेअर करत परीक्षेच्या तारखेबाबत उच्चपदस्थ अधिकारी आणि उमेदवारांमध्ये चर्चा झाल्याचा दावा केला आहे. या प्रकारावरून त्यांनी आयोगाच्या कारभारावरही प्रश्न उपस्थित केले आहेत.

चॅटवरून सवाल

रोहित पवार यांनी विभागीय पोलीस उपनिरीक्षक परीक्षेतील कथित गैरप्रकारांचा संदर्भ देत आयोगातील उपसचिव दिलीप वाघे यांच्यावरही आरोप केले आहेत. या प्रकरणात संशयास्पद भूमिका असल्याचा दावा करत अद्याप कारवाई का झाली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. उच्चपदस्थ अधिकारी उमेदवारांशी अशा प्रकारे संवाद साधत असतील, तर परीक्षेच्या गोपनीयतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण होत नाही का, असा प्रश्नही त्यांनी सरकारला विचारला आहे.

पुरावे माझ्याकडे, मग सरकार कारवाई का करत नाही? विवेक भीमनवारांच्या राजीनाम्यासाठी रोहित पवार आक्रमक

MPSC परीक्षांमधील कथित गैरप्रकारांच्या पार्श्वभूमीवर आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी रोहित पवार यांनी लावून धरली आहे. 27 सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. या आंदोलनात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावं, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. दरम्यान, पुणे पोलिसांनी प्रस्तावित आंदोलनाला परवानगी नाकारली असून पर्यायी ठिकाणांचा पर्याय देण्यात आला आहे.

मोठ्या माशावर आरोप

MPSCच्या विभागीय पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत मास कॉपी, मैदानी चाचणी आणि वैद्यकीय चाचणीमध्येही गैरप्रकार झाल्याचा दावा पवार यांनी केला आहे. आपल्या मर्जीतील उमेदवारांना फायदा मिळवून देण्यासाठी आयोगापासून गृहविभागापर्यंतच्या अधिकाऱ्यांकडून गैरप्रकार झाल्याचा त्यांचा आरोप आहे. आयोगाची स्वच्छता करायची असेल तर केवळ काही व्यक्तींवर कारवाई करून उपयोग नाही, तर जबाबदारीच्या सर्वोच्च स्तरावरही कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. त्यांच्या या आरोपांवर सरकार आणि संबंधित यंत्रणा काय भूमिका घेतात, याकडे आता लक्ष लागलं आहे.

follow us