Video : अजित पवार बाहेर पडणार?; महायुतीतील राजकीय भूकंपावर पंकजांनी सांगितली ‘अंदर की बात’
MLA Pankaja Munde : भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी भाजप सोडून आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर भाजपच्या विधान परिषदेच्या आमदार पंकजा मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या हर्षवर्धन पाटील आणि आमचे कौटुंबीक चांगले संबंध आहेत. त्यामुळे त्यांच्या या निर्णयावर मला काही फार बोलायचं नाही. त्यांचा तो वैयक्तीक निर्णय आहे. परंतु, हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये राहायला हव होत अशी भावना पंकजा मुंडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
Video: हर्षवर्धन पाटील क्षमता असलेला नेता; त्यांचा तो निर्णय चुकला, काय म्हणाले बाळासाहेब थोरात?
याचवेळी त्यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला आहे. त्यावरून विरोधक कायम राजकारण करत असतात. निवडणुकीच्या तोंडावर नाही तर हे निर्णय घेतले जात असतात. तुमच्या काळात तु्म्ही नाही का निर्णय घेतले? असा प्रश्नही पंकजा मुंडे यांनी यावेळी उपस्थित केला आहे. तसंच, निवडणुका या कायम येत असतात. मग निर्णय निर्णय काही घ्यायचेच नाहीत का? असंही त्या यावेळी म्हणाल्या आहेत. दरम्यान, त्यांनी पुण्यातील अत्याचाराच्या घटनेवरही भाष्य केलं आहे.
अजित पवार
यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी अजित पवार यांच्याबद्दल मोठ विधान केलं आहे. त्या म्हणाल्या, जेव्हा आमचं जागावाटप होईल त्यावेळेस मी तुम्हाला ऑफिशयल आकडा सांगेन, अजित पवारांना सन्मानजनक जागा मिळाल्या नाही तर ते बाहेर पडतील असं माझ्या ऐकण्यात
नाही. हे फक्त मीडिया बोलल जात आहे. त्यामुळे ही चर्चा आता सर्वत्र पोहचली आहे असं एकंदरीत वातावरण आहे असं म्हणायला हरकत नाही असंही बोलल जातय.
विधान परिषदेच्या भाजप आमदार पंकजा मुंडे यांना माध्यमांशी बोलताना अजित पवार यांच्या महायुतीतील बाहेर पडण्याच्या चर्चेवर भाष्य केलं आहे. #pankajamunde #Bjp #AjitPawar pic.twitter.com/0dNUjE2DTe
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) October 4, 2024