‘तो’ व्हिडिओ शेअर करीत सुप्रिया सुळेंकडून भाजपला नैतिकतेचे धडे
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यातील महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार कोसळले होते. यानंतर राज्यात सत्तासंघर्ष आणि राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती. त्यानंतर भाजपने एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) मुख्यमंत्री करीत 40 आमदारांसोबत सरकार स्थापन केले आहे. भाजपने एकप्रकारे फोडाफोडी करुन सत्ता स्थापन केली आहे. हा देशातील लोकशाहीवर हल्ला आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केला आहे. यासाठी त्यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा एक व्हिडिओ शेअर करीत देवेंद्र फडणवीस आणि भाजपला नैतिकतेचे धडे दिले आहेत.
सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटवर माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा 31 मे 1996 रोजी संसदेतील विश्वास प्रस्तावावर केलेल्या भाषणाचा व्हिडिओ शेअर केला आहे. अटलजींच्या त्या भाषणाच्या व्हिडिओवर ‘सरकारें आएंगी, जाएंगी, मगर ये देशका लोकतंत्र रहना चाहिए…’ हे वाक्य कॅप्शनच्या दिले आहे.
सरकारें आएंगी, जाएंगी, मगर ये देशका लोकतंत्र रहना चाहिए… – अटल बिहारी वाजपेयी pic.twitter.com/i8FX8uDo0i
— Supriya Sule (@supriya_sule) March 1, 2023
31 मे 1996 रोजी संसदेत विश्वास प्रस्तावात भाषण करताना अटलजी म्हणाले होते, ‘आज देश संकटांनी घेरला आहे आणि ही संकटे आपण निर्माण केलेली नाहीत. जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा त्या वेळच्या सरकारला आम्ही समस्या सोडवण्यासाठी मदत केली आहे. सत्तेचा खेळ चालेल, सरकारे येतील आणि जातील, पक्ष बनतील, पण हा देश राहिला पाहिजे, या देशातील लोकशाही अमर राहिली पाहिजे.’ अटल बिहारी वाजपेयी यांचे ते शब्द भारतीय लोकशाहीची मुल्य सांगणारे आहे. माजी पंतप्रधान नरसिंह राव सरकारच्या कार्यकाळातील आठवण अटलजींनी सभागृहासमोर मांडली होती.
budget session : संजय राऊतांनी बंद पाडली विधानसभा आणि विधानपरिषद
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील सत्तासंघर्ष टोकाला पोहचला आहे. या दरम्यान एकमेकांवर खालच्या पातळीवर टीका केली जातीय. एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदारांसह शिवसेनेत बंडखोरी केली होती. आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला होता. हा वाद निवडणूक आयोगाकडे गेल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिले आहे. यानंतर शिंदे गटाने दिल्लीतील संसदीय पक्षाचे कार्यालय देखील ताब्यात घेतले आहे.