कोथरूडच्या बाई नामांतराची एवढी खुमखुमी असेल तर, बुधवार पेठेचं.. पुण्यात ठाकरे गटाचा बॅनर वॉर

Thackeray Group Banner In Pune : भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी नुकतीच पुणे रेल्वे स्थानकाच नाव बदलण्याची मागणी केली. त्यांनी पुणे रेल्वे स्थानकाच नाव बदलून बाजीराव पेशवे यांचं नाव देण्याची मागणी केली आहे. (Pune) त्यावरून चांगलच राजकारण तापल्याचं पाहायला मिळालं आहे. आता शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला असून त्यांनी थेट बॅनरबाजी सुरू केली आहे.
मेधा कुलकर्णी यांच्यावर समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातून जोरदार टीका झाली. पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतराच्या वादावर. “कोथरूडच्या बाई आपणास नामांतराची एवढी खुमखुमी असेल तर बुधवार पेठेचं नाव मस्तानी पेठ करा” अशा आशयाचं बॅनर शहरात विविध ठिकाणी झळकले आहेत. महत्त्वाच म्हणजे बाजीराव पेशवे यांचं शनिवारवाड्यात वास्तव्य होतं. त्याच शनिवारवाड्याजवळ बॅनर लागले आहेत. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणाच चर्चा सुरु आहे.
सोमवारी 23 जून रोजी पुणे आणि सोलापूर रेल्वे डिवीजनची बैठक बोलवण्यात आली होती. अनेक संघटनांनी पुणे रेल्वे स्टेशनच नाव बदलून बाजीराव पेशवे करण्याची मागणी केली आहे. ‘मी फक्त त्या मागणीची पुनरुच्चार केला’ असं भाजप खासदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या आहेत. लोकांना पुण्याचा गौरवशाली इतिहास माहित व्हावा, हा आपला त्या मागणीमागे उद्देश आहे असं खासदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या आहेत.
पुणे एक सांस्कृतीक आणि शैक्षणिक केंद्र आहे. पुणे आयटी इंडस्ट्रीसाठी सुद्धा ओळखलं जातं. पण पुण्याबरोबरच अन्य राज्यातील, शहरातील लोकांनी या शहराचा इतिहास जाणून घ्यावा असं अस आपल्याला वाटत म्हणून आपण तशी मागणी केली असही त्या म्हणाल्या आहेत. दरम्यान, आता या बॅनरबाजीने पुन्हा एकदा ठाकरे गट आणि भाजप आमने-सामने आल्याचं चित्र आपल्याला पाहयला मिळत आहे.