Pune Crime : पुण्यातील ‘त्या’ तिसऱ्या संशियत दहशतवाद्याचा फोटो आला समोर…

Pune Crime : पुण्यातील ‘त्या’ तिसऱ्या संशियत दहशतवाद्याचा फोटो आला समोर…

Pune Crime : गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्यात दोन संशयित दहशतवाद्यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं होत. त्यावेळी त्यांच्यासोबत तिसरा आणखी एक संशियत दहशतवादी होता. मात्र त्याने पळ काढल्याने पोलीस त्याला पकडू शकले नाही. मात्र आता त्याचा फोटो समोर आला आहे. शहानवाज आलम असं त्याचं नाव असून अनेक गुन्ह्यांमध्ये तो आरोपी आहे. याच तिसऱ्या संशयित दहशतवाद्यानी अटक असलेल्या दोन दहशतवादी मोहम्मद युनूस साखी ,आणि इमरान खान याला मदत केली होती. (Third Suspected Terrorist Jaipur Most Wanted Arrested in Pune Crime )

कर्जत एमआयडीसीच्या प्रस्तावित जागेत नीरव मोदीची जमीन; राम शिंदेंच्या दाव्याने मोठी खळबळ

काय आहे प्रकरण?

देशविघातक कृत्याच्या संशयावरून पुणे पोलिसांनी बुधवारी 19 जुलैला दोघा जणांना कोथरूड परिसरातून मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. हे तिघेजण दुचाकी चोरताना पोलिसांच्या तावडीत सापडले होते. पण पोलिसांनी जसजसा चौकशीचा फास आवळला तसतसे धक्कादायक खुलासे होत गेले. पोलिसांनी पकडलेले हे दुचाकीचोर चक्क राजस्थानमध्ये मोस्ट वॉन्टेड आणि एनाआयएच्या रडारवर असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले.

Amitabh Bachchan: महिलांच्या अंतर्वस्त्राबद्दल बिग बीं यांचं ‘ते’ ट्वीट चर्चेत; म्हणाले, ‘ब्रा आणि पँटी…’

पुणे पोलिसांकडून सध्या वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर गस्त व पेट्रोलिंगवर भर दिला जात आहे. बुधवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास कोथरूड पोलिस स्टेशन बीट मार्शल पेट्रोलिंग पथकातील पोलिसांना तिघे जण दुचाकी चोरताना आढळले. त्यांची हालचाल ही संशयास्पद दिसली. कर्मचाऱ्यांनी लागलीच मदत बोलवत त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी सुरू करण्यात आली. त्या दरम्यान त्यांच्याकडे एक लॅपटॉप, चार मोबाइल तसेच बनावट आधारकार्ड मिळाले.

पुढे त्यांची सखोल चौकशी सुरू करण्यात आली. या दरम्यान चौकशीत काही संशयास्पद आढळून आले. त्यामुळे लागलीच वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी धाव घेतली. तर पुणे एटीएसला माहिती देण्यात आली. दिवसभर या दोघांकडे चौकशी केल्यानंतर ते NIA कडून फरार असलेले दहशतवादी असल्याचे समोर आले. त्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर आता त्यावेळी फरार झालेला तिसरा संशयित दहशतवाद्याचा फोटो आला समोर आला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube